सांगली – ज्योती मोरे
पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या संस्थेत बाह्यरुग्ण विभागाचे विस्तारीकरण रक्तपेढीचे नूतनीकरण व ५ नवीन कक्षाचे बांधकाम करणेसाठी व नूतनीकरणाच्या बांधकामासाठी प्राप्त झालेला निधी व खर्च झालेल्या निधी बाबत व बांधकाम विषयक पूर्ण झालेल्या कामकाजाविषयी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
सदर बैठकीस मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली विधानसभा सदस्य व अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, सहा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पवार, डॉ. प्रभाकर पाटील, अधिसेविका श्रीमती सीमा माने, स्वच्छता निरीक्षक श्री. वसंत इंगळे, तसेच अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर, अधीक्षक अभियंता. एस पी कुंभार, कार्यकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचे संतोष रोकडे,
सार्वजनिक बांधकाम उप.विभाग सांगली अमर नलवडे, शाखा अभियंता अभय क्षीरसागर, अरुण पवार, मोहिते अन्ड सन्सचे झुंजार मोहिते, विश्वजित पाटील आदि उपस्थित होते. सदर बैठकीत बाह्यरुग्ण विभागाचे विस्तारीकरण रक्तपेढीचे नूतनीकरण व ५ नवीन कक्षाचे बांधकाम करणेसाठी व नूतनीकरणाच्या बांधकामासाठी प्राप्त झालेली निधी बाबत चर्चा करण्यात आली,
त्या अनुषंगाने प्रलंबित असलेले बांधकाम विषयक कामकाज रुग्ण सेवेच्या दृष्टीने त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली विधानसभा सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधीत अधिकार्यांना दिल्या. तसेच सदर कामकाजासाठी अजून निधीची गरज असल्यास त्याचा प्रस्ताव त्वरित तयार करून संबंधीताना देण्याबाबत सांगितले.