मूर्तिजापूर :- विधानसभा मतदार संघात भावी आमदारांच्या स्पर्धा बघायला मिळत असून नाव करण्यासाठी वेगवेगळे स्टंट करतांना दिसत आहे. या सर्वांमध्ये चर्चा आहे फक्त सम्राट डोंगरदिवे यांची, त्यांनी कावडच्या कार्यक्रमात व गणपती मंडळाला भरमसाठ वर्गणी दिल्याच्या चर्चेने त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चिंतेत टाकले. यापूर्वी सुध्दा सम्राट यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबल्याने त्यांच्याच नावाची चर्चा आता मतदार संघात आहे, त्यामुळे इतरांची सट्टी-पीट्टी गुल झाली आहे.
निवडणूक म्हटलं की पैसा आला आताच्या काळात पैशाशिवाय निवडणूक नाही, हे सूत्र आहे, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर येऊन नाव करण्यासाठी व आपल्याला साहेबांनी तिकीट दिलं पाहिजे यासाठी विविध प्रकारची मदत करून दाखवतात, की, पहा माझ्या पेक्षा समाजात मोठा दानी नाही पण निवडणूक असो किंवा नसो पैसा खर्च करण्यासाठी मोठी दानत लागते ते फक्त ‘सम्राट’ यांच्यात दिसून येते. इतरही करतात पण त्याचा इव्हेंट करून मदत केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतात पण सम्राट यांचं तसं नाही मदत करतानाचे फोटो व्हायरल करीत नाही.
सम्राट यांनी प्रतिस्पर्धीना कोमात टाकल्याची सध्या मतदार संघात चर्चा आहे, तर एका प्रतिस्पर्धीच्या दररोजच्या कोट्यात 90 ची वाढ झाल्याचे बोलल्या जाते. दुसरा प्रतिस्पर्धी मतदारसंघातून बाद झाला व सोबतच सर्व कार्यक्रम बंद झालेत. एक प्रतिस्पर्धी तर कार्यकर्त्याला कार्यक्रमासाठी सोबत घेऊन जातो आणि डीझलचे पैसे मागतो एवढंच नाहीतर जेवणासाठी आपसात पैसे गोळा करून जेवण देतो, अन स्वतःला मोठा लीडर समजतो असेही महारथी आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्त्यांना खुश कसे ठेवायचं हे सम्राट यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कारण कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणूक आहे, ज्यांच्याकडे कार्यकर्ते तोच बाजी मारणार.
सम्राट 2009 पासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मतदार संघात सक्रिय झाले, तेव्हा पासून आजपर्यंत त्यांची जिद्द आणि चिकाटी व मतदारांना विषयी असलेली आपुलकी दिसून येते म्हणूनच मनमोकळे पणाने दान देतात. आतापर्यंत त्यांनी बराच पैसा मतदारसंघात खर्च केला पण कधीच बोलून दाखविले नाही.