मूर्तिजापूर : राज्यात विधानसभेची लगबग सुरू झाली आहे तर यासाठी सवर्च पक्षातील हालचाली वाढल्या सोबतच भावी उमेदवारही मैदानात उतरले असून आपण उमेदवार आहो म्हणून शहरात विविध ठिकाणी पोस्टरबाजी तर काही सोशल मीडियाचा वापर करून आपणच सक्षम उमेदवार असल्याचे दाखवत आहे. अश्यातच चर्चा होते मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाची या मतदार संघात अनेक भावी उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले केले आहेत. तर तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी सुरु असून हे जनतेला माहिती देण्यासाठी सर्रास सोशल मिडीयाचा वापर करतात. अश्यातच भाजपकडून इच्छुक उमेदवार गेल्या अनेक दिवसापासून लोकांना फालतू मेसेज टाकून लोकांना छळत असल्याचे दिसत आहे, मी किती मोठा असल्याचे दाखवत आहे. या उलट जे सत्तेत असलेले आमदार तरी एवढे फोटो टाकत नाही, मात्र हा अतिउत्साही उमेदवार प्रसिद्धी पिसाट असल्याचे दिसून येत आहे. तर सदर उमेदवार हा स्वतःची जात लपून मतदारसंघात प्रचार करत असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. तर हा नकली हिंदू व अशिक्षित उमेदवार दहावी नापास असून आपल्या घरातील एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वास्तविक पाहता या उमेदवाराची अशी कोणतीही चांगली गोष्ट किंवा मोठे कार्य अजून पण दिसले नाही आणि नेत्याच्या भेटीसाठी मुंबई दौरे करीत असताना माझ्याकडे कार आहे, आणि आयफोन दाखविण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असते. एवढच काय तर आम्ही कारने मुंबई प्रवास करतो हे दाखविण्यासाठी रस्त्याने जात असताना व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकणं हा त्याचा उद्योग समजला जातो. ज्या नेत्याचं अजिबात काही देणं घेणं नसते अशाच नेत्यांचे फोटो टाकून मी किती मोठा उमेदवार असल्याचे दाखवत आहे. तर अनेकांच्या मते ही व्यक्ती स्वताला मोठ दाखविण्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याचा घरात जाऊन शिरते आणि सेल्फी फोटो काढून आपली मोठमोठ्या नेत्यांची ओळख असल्याचे दाखवत प्रतिस्पर्धी भावी उमेदवारांना चिमटे घेते.
तर काही नेते हा उमेदवार दिसल्यावर नाक मुरडत असल्याची समजते मात्र एक सहानुभूती म्हणून नेते त्यांना फोटो काढू देतात तर हा उमेदवार त्याचाच फायदा हा उमेदवार घेतो. एवढा लागट प्रजातीचा असल्यामुळे याला आता नेतेही कंटाळून गेले आहेत. हा उमेदवार स्वताच अतिक्रमण करून वास्तव करीत असल्याचे लोक सांगतात. या उमेदवाराला शेजार्याच सुद्धा मत मिळत नाही. तर हा असली हिंदू असल्याचं दाखवत सध्या प्रचार करत असल्याचा समजते. हा उमेदवार खोटी जनसेवा करून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न करीत असून मतदारसंघातील लोकांना मूर्ख बनवत आहे. अशा दहावी नापास उमेदवाराला मतदारसंघातील मतदार निवडून देतील का?….