बाळापूर तालुक्यातील भिखुडखेड गावा लगत असलेल्या भिखूंड खेड नदी काठी गु जाफर शे हसन व आ साबीर आ रसूल हे मासे पकडण्यासाठी काठा वर गेले होते त्यावेळी नदी ला व नदीच्या बाजूला असलेले नाले ची पाणी पातळी अचानक वाढली त्यामुळे ते घाबरून गेले दोघांना ही पोहणे येत नव्हते.
याबाबत सरपंच भिखुंडखेड सागर उपरवाट व आमदार नितीन देशमुख यानी तहसीलदार राहुल तायडे व ठाणेदार अनिल जुमले यांना याबाबत माहिती दिली दोघेही पथक घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहचले तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती देण्यात आली जिल्हाधिकारी निमा अरोरा व निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांनी सुद्धा अकोला येथून टीम रवाना केली टीम पोहचण्याचा आधीच तहसीलदार व ठाणेदार यांनी स्थानिक युवकांची मदत घेऊन त्यांना काढण्याचं निर्णय घेतला.
यावेळी स्थानिक युवक यांनी हिम्मत दाखविली यामधे. आदेश इंगळे, धनेश इंगळे,रितेश शेगोकर , अमर शिरसाट, महेंद्र वानेखेडे , रवींद्र वानखेडे, सुदेश इंगळे, आदित्य तायडे, यांच्यासह माचींद्रनाथा पथक यांनी लाईफ जॅकेट, रिंग व दोराचा वापर करुन त्यांना सुरक्षित पुरां मधून बाहेर काढण्यात यश मिळविले यावेळी सामजिक कार्यकर्ते रमेश लोहकरे, शेलार मामा,
रमेश मेसरे व वणाखडे तसेच ठाणेदार अनिल जुमले सह श्री अरुण मदनकर पी एस आय सोहेल खान इस्माईल खान, प्रशांत बोडदे,आकाश राठोड,ह्यांचे सह,तहसीलदार राहुल तायडे यांचे सोबत मंडळ अधिकारि दीपक सोळंके, तलठी गजानन भागवत, अमोल पवार यांनी सुधा महत्वाची भूमिका पार पाडली 2 तरुणांना जिवंत बाहेर काढल्या मुळे सगळ्यनी आनंद व्यक्त केला व सर्व टीम चे कौतुक होत आहे.