रामटेक – राजु कापसे
श्रीराम शिक्षण संस्थेद्वारा संचालित ताई गोळवलकर महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद ग्रंथालय द्वारा भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या 131 व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून आभासी पद्धतीने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केल्या गेले होते परिसंवादाचा विषय शोधनिबंधाचे लिखाण तथा वाड्मय चौर्य हा होता.
ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती, तक्षशिला महाविद्यालय अमरावती आणि रामकृष्ण महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
परिसंवादाचे उद्घाटन दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. कीर्तीताई अर्जुन यांनी केले त्यांनी प्रमाणित शोधनिबंधाची आवश्यकता तसेच शोधनिबंधात होणाऱ्या गैरप्रकारांना आढा घालण्याबाबत मार्गदर्शन केले परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. राजेश सिंगरू प्राचार्य ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक हे होते.
त्यांनी शोधनिबंध लिहिताना काय अडचणी येतात आणि त्या कशा सोडवाव्यात यासंबंधी मार्गदर्शन केले परिसंवादाच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. महेंद्र मेटे (ग्रंथपाल, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती) शोधनिबंध लेखन पद्धती, संदर्भ कसे लिहावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. मंगला हिरवाडे, ग्रंथालय व माहिती शास्त्र विभाग प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांनी वाड्मय चौर्य या विषयावर उद्बोधन केले. परिसंवादात वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, संशोधक आणि एम एस सी चे विद्यार्थी उपस्थित होते.
परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. उज्वला देवरणकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुधीर सांगोळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप खंडारे यांनी करून दिला तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रणाली पेटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.