लाखपुरी – ०८ तिर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान लाखपुरी ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथे श्रावण महिन्यात शेवटच्या रविवारी दि. १० सप्टेबर २०२३ कावड यात्रा संपन्न होणार आहे. कावड यात्रेत मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील हजारो शिवभक्त सहभागी होणार आहे. शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री लक्षेक्ष्वर संस्थान व प्रशासन यांनी विविध उपाय योजना केल्या आहे.
कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून आज यात्रा स्थळाची पाहणी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदिप अपार ,तहसीलदार शिल्पा बोबडे , ग्रामिण पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या.यावेळी विस्तार अधिकारी विजय किर्तने.
मंडळ अधिकारी राजु जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव ,तलाठी संदिप बोळे , मा. बावणे , सरपंच राजप्रसाद कैथवास , संस्थानचे सेवाधारी चंद्रजीत देशमुख, नाना मेहर, त्रीलोक महाराज, प्रमोद अवघड, नजाकत पटेल, ओम बनभेरू, दिगंबर नाचणे, प्रेम कैथवास, देविदास चव्हाण, तुळशीराम वरणकार,सूरज कैथवास नितीन सुरजुसे,
दत्ता जामनिक , प्रमोद लोखंडे , दिलीप सुरजुसे ,सुरेंद्र जोगी , श्रीकांत देशमुख,आकाश जोगी , लादू महाराज ,विजय तामसे , मंगलसिह चौहान ,सचिन तामसे , गुड्डू शर्मा, पिट्टू कैथवास उपस्थित होते. उपस्थित अधिकारी यांचे संस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. बैठकीचे संचालन संस्थानचे अध्यक्ष राजुभाऊ दहापुते यांनी केले.