अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक, मूर्तीजापुर शहर व ग्रामीण तसेच माना पोलीसांचा स्तुत्य उपक्रम…
बॅड टच व गुड टच याबाबत एम झेडएएकू कुरेशी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर मूर्तिजापूर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन…
११२ व १०९२ ह्या नंबरवर कॉल करून एखाद्या अप्रिय घटनेची माहिती देवून, सुटका करून घेऊ शकता…
मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मुर्तीजापुरजापूर येथील कोकणवाडी स्तित महालक्ष्मी मंगल कार्यालयात महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया मार्फत महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजने बाबतीत, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांची संकल्पना व अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली,जनजागृती सप्ताह सुरु आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज दि.५ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी, मुर्तीजापुर शहरातील महालक्ष्मी मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातील भारतीय ज्ञानपीठ,गाडगे महाराज विद्यालय, मूर्तिजापूर हायस्कूल मुर्तीजापुर तसेच आदर्श कन्या विद्यालय येथील मुलें व मुलीं सह शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
एम झेडएएकू कुरेशी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर मूर्तिजापूर व उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कुमार घुगे ह्यांनी आपल्या खास शैलीतून,अल्पवयीन मुलामुलींनी काय काय काळजी घ्यायची, याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये व्यासपीठावर शहरातील नगर परिषद मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे व दामीनी आणि भरोसा सेल च्या प्रमुख उज्वला देवकर प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व वक्त्यानी सांगितले की आपल्या सोबत घडत असलेल्या अत्याचारा बाबत आईबाबा व ज्यांना आपण आपले मानत असतो, ज्यांच्यावर विश्वास वाटतो अशा व्यक्तींना सांगितले पाहिजे.
तसेच चॉइल्ड लाईन व महिला हेल्प लाईनच्या क्रमांकावर फोन करून सदर घटनेबद्दल सांगावे. जेणेकरून आपल्या सोबत घडलेल्या किंवा घडु शकणाऱ्या वाईट प्रसंगाला सर्वासमोर आणता येईल. आणि अशा कुप्रवृत्तींच्या मंडळीना कठोर शिक्षा करता येईल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कुमार घुगे,उद्घाटक एम झेडएएकू कुरेशी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर मूर्तिजापूर,प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे,दामिनी तथा भरोसा सेलच्या प्रमुख उज्वला देवकर यांची उपस्थिती होती.
तसेच तसेच पो.स्टे.परिसरातील,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका,शांतता समिती सदस्य, बचत गटाच्या महिला,विद्यार्थ्यांचे पालक असे एकूण ७०० ते ८०० विद्यार्थी व नागरिक ,महिला पोलीस दक्षता समीती सदस्या ,शिक्षक /शिक्षिका,पत्रकार व शहरातील गणमान्य मंडळी सुद्धा हजर होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होण्यासाठी मुर्तीजापुर शहर पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे व ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत,माना पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंश,मनोहर वानखडे,आदींसह मुर्तीजापुर शहर ग्रामीण व माना पोलीस स्टेशनचे समस्त महिला व पुरुष पदाधिकारी व कर्मचारी,गृह रक्षक दलाचे जवान ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेवुन सदर कार्यक्रम यशस्वी केला.