मूर्तिजापूर – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली 03.03.2024 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, मूर्तिजापूर येथे सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतमध्ये दिवाणी वाद व तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत आणी पाणी देयके, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणी पटट्टी कराचे दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतमध्ये सुनावणीकरिता ठेवण्यात आली होते.
सदर लोकअदालतमध्ये दोन पॅनल ठेवण्यात आले होते. पॅनल 1 वर पॅनल प्रमुख म्हणून एम. झेड.ए.ए.क्यु. कुरैशी, दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्र. श्रेणी मुर्तिजापूर हे होते व पॅनल के 2 वर पॅनल प्रमुख म्हणून आसीफ जी.तांबोळी, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्र. श्रेणी. मुर्तिजापूर हे होते पॅनल कं. 1 वर पॅनल विधीज्ञ म्हणून ॲड. एस.पी. बरडे व पॅनल 2 वर पॅनल विधीज्ञ म्हणून ॲड. एस.व्ही. तायडे होते.
सदर लोकअदालतमध्ये दोन्ही न्यायालयातील दिवाणी व फौजदारी ची एकूण 749 प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 150 प्रकरणामध्ये आपसी तडजोड होवून सदर प्रकरणे निकाली निघाली. तसेच बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणी पट्टी कराचे प्रकरणे ठेवण्यात आलेली होती व त्यापैकी 3339 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. ज्यामध्ये एकूण वसुली 46,12,539 /- झाली.
न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणामध्ये एकूण रु.54,58,879/-एवढी वसुली झाली व बँकेचे कर्ज वसुली प्रकरणमध्ये एकूण 17 प्रकरणे निकाली निघाली व एकूण वसुली 15,92,920/- झाली. ग्रामपंचायत घरपट्टी व पाणी पटट्टी कराचे यंदा अभूतपूर्व वसुली झाली.
सदर लोकअदालत यशस्वी करण्यासाठी एम. झेड. ए. ए.क्यु. कुरैशी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर मुर्तिजापूर व आसीफ तांबोळी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मूर्तिजापूर व मुर्तिजापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.सचिन वानखडे, सचिव ॲड. राधिका काळे, ॲड.श्रद्धा गुल्हाने, ॲड. पी.पि.पाटील, ॲड. राजेश हजारी, ॲड. शरद मेहरे, ॲड. पंकज जामनिक,
ॲड. गजानन वानखडे , ॲड. सोनटक्के, ॲड. राहुल महल्ले, ॲड.अशोक चक्रे, ॲड. कुंदन वानखडे, ॲड. निलेश सुखसोहले , इतर विधीज्ञ, पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहरचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, पोलीस स्टेशन ग्रा. चे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत तसेच पोलीस स्टेशन मानाचे पोलीस निरीक्षक सुरेश सुरोसे तसेच पोलीस हेड कॉस्टे.
विलास वानखडे, भिमराव नाईक, तसेच पंचायत समितीचे बी. डी.ओ. अशोक बांगर, विस्तार अधिकारी विजय किर्तने, सोबत सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष काळे तसेच (मूर्तिजापूर), सोनोरी, जितापूर खेडकर, हिवरा कोरडे व चिखलीचे ग्रामसेवक , तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा. अधीक्षक सौ. आर.बी.दिगंबर,
स. अधिक्षक पि.पि.महाजन , राजेश सरोदे, सागर ठाकूर, सचिन शहापूरकर, ज्ञा.चव्हाण, सरदार, शहा, भगत ,आ.सावजी,रोशन लांजेवार, प्रसन्न गादिया, मयुर धापड,कुणाल गावंडे, यांनी अथक परिश्रम घेतले.