रामटेक – राजू कापसे
गेला आठवडा हा तालुक्यातील विविध शाळेत ‘ शिक्षण सप्ताह ‘ म्हणून पार पडला. दरम्यान तालुक्यातील विविध शाळेत विद्यार्थ्यांचे विविध मनमोहक उपक्रम पार पडले. यादरम्यानच शहरातील चर्चीत समर्थ प्राथमिक शाळेत ‘ शिक्षण सप्ताह ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सप्ताहादरम्यान शाळेतील चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या प्रदर्शनाने शिक्षण सप्ताह कार्यक्रम अक्षरशः बहरल्याचे चित्र दिसुन आले.
शहरातील समर्थ प्राथमिक शाळा ही वर्षभर विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच चर्चीत असते. येथे नुकताच दि.२२ जुलै ते २८ जुलै या आठवड्यात शिक्षण सप्ताहाचे यशस्विरित्या आयाेजन करण्यात आले हाेते. यात प्राथमिक शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला हाेता. यात अध्ययन, अध्यापन साहित्य तयार करणे, साक्षरता दिवस, कोरडा दिवस, विविध देशी खेळाचे आयाेजन व क्रिडा शपत ,सांस्कृतिक दिवस यामध्ये विविध पारंपारीक वेशभुषा करुन मनमाेहक नृत्य, नाटक ,भक्तिगिते विद्यार्थांनी सादर केली होती.
याबरोबरच शाळेत डिजिटल तंत्रद्धानाचा वापर करुन तंत्रज्ञान दिवस सुद्धा साजरा करण्यात आला. वृक्षाराेपन व वृक्षदिंडि काढुन ईकाे-क्लबची स्थापना करण्यात आली. शेवटी शाळेत समुदाय सहभाग वाढविण्याकरिता विद्यांजली कार्यक्रमाची माहीती देण्यात आली व या सप्ताहाची सांगता विद्यार्थांना स्नेहभाेजाचे स्वच्छ व सुंदर आयाेजन करुन पाेषण आहारात दिल्या जाणाऱ्या आहारातुन मिळणार्या उषमांकाची माहिती विद्यार्थांना देण्यात आली .या सप्ताहाच्या यशस्वी व नियाेजनबद्द आयाेजनाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना गुंढरे मँडम व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले हे येथे विशेष.
‘ राया ‘ च्या भक्तीगित सादरीकरणावर टाळ्यांचा गडगडाट
शिक्षण सप्ताहादरम्यान समर्थ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गातील चिमुकला विद्यार्थी ‘ राया पंकज बावनकर ‘ याने ‘ विठ्ठल माझा माझा ‘ या भक्तीगिताचे उत्कृष्टरित्या व ताला सुरात सादरीकरण केले. त्याच्या भक्तीगिताचे मनमोहक सुर काणी पडताच उपस्थितांनी टाळ्यांच्या मोठा गडगडाट केला. टाळ्यांच्या आवाजाने शाळेचा सभागृह अक्षरशः दणानून गेला असल्याचे चित्र यावेळी दिसुन आले.