Saturday, November 16, 2024
Homeराज्यस्वच्छता पंधरवडा अंतर्गत 'स्वच्छता हि सेवा' एक तारीख एक तास उपक्रमाची यशस्वीपणे...

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत ‘स्वच्छता हि सेवा’ एक तारीख एक तास उपक्रमाची यशस्वीपणे अमलबजावणी…


मूर्तिजापूर – गृह व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान २.० (ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी दि. १५ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०२ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून “स्वच्छता ही सेवा” मोहीमेअंतर्गत “एक तारीख-एक घंटा” (एक तारीख-एक तास) उपक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता एक तास श्रमदान करून हा स्वच्छता उपक्रम नगर परिषद व लोकसहभागातून राबविण्यात आला.

सदर उपक्रम संपूर्ण शहरात व मोठ्या प्रमाणावर कचरा असलेल्या ठिकाणी नगर परीषद पथक निर्माण करून व सर्व पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर उपक्रम यशस्वी करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रेल्वेस्टेशन परिसर, बस स्थानक, आठवडी बाजार परिसर , जलशुद्धीकरण केंद्र, धार्मिक स्थळे, शासकीय सार्वजनिक व खाजगी कार्यालय या परिसरामध्ये प्रामुख्याने अभियान राबविण्यात आले.

सदर अभियानात मा. आमदार हरिष पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, मा.न्यायाधीश एम झेड कुरेशी साहेब, मा. ए. जी. तांबोळी साहेब, तहसीलदार शिल्पा बोबडे, प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे, नायब तहसीलदार बन्सोड साहेब, माजी नगराध्यक्षा मोनाली गावंडे, भाजपा पदाधिकारी रावसाहेब कांबे, रितेश सबाजकर, सतिष शर्मा, अभय पांडे, माजी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, सुनील पवार , तसलिमखा बिस्मिल्लाखाँ, समाजसेवक गजानन नाकट , शैलेश भेलोंडे, संदीप जलमकर ,

देविदास गोळे, कैलास महाजन सर्व माजी नगरसेवक पंचायत समिती कार्यालय अधिकारी कर्मचारी, मुर्तिजापूर स्वच्छता अभियान टीम चे सत्यनारायण तिवारी, विलास नसले, बांबल सर, देवके सर, दिनेश श्रीवास, विलास वानखडे रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले. नगर परिषद कार्यालय कडून निवड केलेल्या स्पॉटवर नगर परिषदच्या अधिकारी कर्मचारी तसेच डे एनयुएलएम. अभियानातील सर्व बचत गट सदस्य,

हॅपी वुमन क्लब, शारदा महिला मंडळ कोकणवाडी सर्व सदस्य तसेच मुर्तिजापूर शहरांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपला सहभाग दिला. या उपक्रमाच्या प्रेरणेतून मुर्तिजापूर शहरांत इतर ठिकाणी , प्रत्येक वार्ड प्रभाग , शाळा , कार्यालय येथेसुद्धा नागरिकांनी मोठया प्रमाणात आपापल्या परीसरात स्वच्छता उपक्रम राबविले व आपला सहभाग नोंदविला .

सदर स्वच्छता उपक्रमाकरिता आवश्यक असलेले झाडू, केर भरणी, कचरा पेट्या, वाहन इत्यादी साहित्यांची व्यवस्था स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेला कचरा योग्य ती विल्हेवाट लावण्याकरिता कचरा प्रक्रिया केंद्रावर वाहून नेण्याची व्यवस्था नगर परीषद मार्फत करण्यात आली होती. सदर उपक्रम राबविण्यात उपमुख्याधिकारी अमोल बेलोट, राजेश भूगुल, निशिकांत परळीकर, दातीरसर, केतन चींचमलातपुरे, विजय लकडे, नरसिंग चावरे, प्रसाद सूर्यवंशी, पुरूषोत्तम पोटे, अनिकेत मंगरुळकर, सर्व विभाग प्रमुख कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: