नरखेड – अतुल दंढारे
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर दिनांक 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत विशेष नियमित शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदरवाडा (रोहना ) येथे करण्यात आले होते.
वरील कार्यक्रमाची सुरुवात दि. 16 फेब्रुवारीला शिबिरार्थ्याची नोंदणी उभारणी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन परिसर माहिती परिसर स्वच्छता इत्यादी कार्यक्रमाने झाली. दि. 17 फेब्रुवारी 2023 ला संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. रणजिततबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनिय कार्यक्रमाला रोहना गट ग्रामपंचायतच्या उपसरपंच मा. सौ कुमुद ताई जगनिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार मराठी विभाग प्रमुख साधना जिचकार आय क्यू एसी समन्वयक डॉ. श्रीकांत ठाकरे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर शिबिरार्थ्यांनी गावामध्ये श्रमदान केले. दि. 18 फेब्रुवारी 2023 ला दिवसाची सुरुवात प्रार्थनेने झाली.शिबिरार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले.
याच दिवसाला महाशिवरात्रीचे अवचित्य साधून शिबिरार्थ्यांनी जवळच असलेला टेकडी पारडसिंगा येथे स्वयंसेवा दिली. पुढील दिवशी 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. नंतर शिबिरार्थ्यांनी श्रमदान केले. त्यानंतर स्वातंत्र्यसंग्रामात जनजातीय नायकांचे योगदान या विषयावर सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जी धुर्वे यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानामध्ये त्यांनी आदिवासी समाजामध्ये असलेले विविध नायक यांच्यावर प्रकाश टाकला. तसेच याच दिवशी शिबिरार्थ्यांकरिता प्रदर्शनीचे भव्यदिव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 20 फेब्रुवारी 2023 ला इंदरवाडा या गावांमध्ये ग्रामस्वच्छता करण्यात आली. त्यानंतर जनजागृती करिता प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. नंतर विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यांच्या कसरती घेण्यात आल्या. त्यानंतर ग्रामविकासात युवकांची भूमिका या विषयावर तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथील प्रा. दिगांबर टुले यांचे जाहीर व्याख्यान झाले. तसेच सोबतच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईचे श्री. मयूर साठवणे यांचे गावातील अशिक्षित महिला यांच्या विषयी जागरूकता निर्माण करणारे व्याख्यान झाले.
तसेच याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील रक्तपेढी या रक्तदान शिबिराला उपस्थित होते. जवळपास 40 शिबिरार्थ्यांनी रक्तदान केले. त्यानंतर याच रक्तपेढीतील श्री. अमोल ईदलाबादकर यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून शिबिरार्थ्याचे मनोरंजन केले.
दि. 21 फेब्रुवारीला शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जीवन विकास महाविद्यालय देवग्रामचे प्राचार्य डॉ. देवेंद्रजी भोंगाडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मा. संजयजी बडोदेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेड यांचे विशेष उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 125 शिबिरार्थी हजर होते. आपल्या समारोपीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व समजावून सांगितले. वरील शिबिर कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष काटे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.अमित गद्रे, डॉ. सुरेंद्र सिनकर शिबिर प्रमुख प्रा. राजेंद्र घोरपडे,डॉ.शिबिर संयोजक मनोज कुमार वर्मा सहाय्यक शिबिर प्रमुख या समितीने यशस्वी आयोजन केले.
या शिबिरामध्ये डॉ. साधना जिचकार, डॉ. दादाराव उपासे, डॉ. रिता वाळके, डॉ. श्रीकांत ठाकरे, डॉ. स्मिता गुडधे, डॉ. मेघा रघुवंशी, डॉ. नितीन राऊत, डॉ. पितांबर गायकवाड, डॉ. अविनाश इंगोले, डॉ. शैलेश बनसोड, प्रा. विजय रहांगडाले, डॉ. अंजली घारपुरे,प्रा. सतीश इखे , डॉ. भाविक मणियार,प्रा. संपत सिंगडा, प्रा. भारत मडावी, डॉ. राम डोंगरे, डॉ. गजेंद्र कुवारे, प्रा. अजय मंगल, प्रा. भूषण खोडे,प्रा.कपिल सिरस्कर प्रा. अनिकेत चिंचमलातपुरे, प्रा. पूजा मारोटकर, प्रा. माहेश्वरी कोकाटे, प्रा. अंकिता पावडे, डॉ. धनराज सावरकर, प्रा. अरुण चौधरी व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.