सांगली – ज्योती मोरे
मराठा आरक्षणाच्या बाबतीत,कुणबी नोंदी सापडलेल्यांसाठी ,सगे-सोयरे यांच्या समावेशा बाबतीत अधिसूचना महाराष्ट्र शासनाने काढल्याने श्री मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला यश आले आहे.म्हणून श्री मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच उप मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व श्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रतिनिधींचे आभार.
श्री जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ही मागणी केली होती, त्याप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा 54 लाख बांधवांना व नवीन अधिसूचनेप्रमाणे त्यांच्या सगे-सोयऱ्याना आरक्षणाचा लाभ होणार आहे.या निर्णयामुळे कोट्यवधी मराठा बांधवांचा फायदा होणार आहे.
यामुळे मराठा समाजाची मुले आर्थिक परिस्थितीमुळे जे शिक्षणापासून वंचित राहत होते त्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत.उर्वरित मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत शासन कटीबद्ध असून,सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटीव्ह पिटीशन मधून ते आरक्षण टिकण्वयाची हमी युती शासनाने घेतलेली आहे.
यासाठी योग्य ते अहवाल व युक्तिवाद लवकरच कोर्टासमोर सादर केला जाणार आहे .आता मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकलेली आहे.या मधे प्रत्यक्ष सामील झालेल्या सर्व बांधवांचे देखील अभिनंदन.विविध समाजबांधवानी या लढ्यात मराठा समाजाच्या मागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतली त्यांनाही धन्यवाद.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या सर्व बांधवांचेही आभार,राज्यातील सामाजिक सलोखा यापुढेही असाच कायम राहावा.पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांचे खूप खूप अभिनंदन…