८ कोटी ७० लक्ष मंजूर, पुलिया, रस्ते साठी ५३ कोटी निधी मंजूर…
भंडारा – सुरेश शेंडे
मोहाडी – तुमसर /मोहाडी विधानसभेंचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून तुमसर तालुक्यात 30 तलाठी कार्यालय बांधकाम 15 लक्ष रुपयाचे मंजूर झाले आहेत. तसेच मोहाडी तालुक्यात 34 तलाठी कार्यालय बांधकाम मंजूर झाले आहेत.तसेच 3 मंडळ कार्यालय मंजूर झाले त्यात एकूण मिळून 8 कोटी 70 लक्ष रुपये निधी मंजूर झाले आहे.
तुमसर विधानसभेत जनसंपर्कात राहून आमदार कारेमोरे यांच्या माध्यमातून सिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत तसेच विविध योजने अंतर्गत भरपूर निधी तुमसर विधानसभेत आणला असून गाजावाजा न करता शेकडो कोटी रुपयाची कामे मंजूर करवून घेतली.
संपूर्ण विधानसभेत प्रत्येक गावात विकासकामे त्यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. नव्याने मंजूर त्यात सिमेंट रस्ते, मिटेवाणी गायमुख, सिहोरा-मांगली -टेमणी, आसलपणी-कारली -गणेशपूर-पवनारखारी, चिखला -राजापूर, चिखला -भोंडकी, गोवारीटोला -मांडेकसा, आलेसूर -बावनथडी , गोबरवाही -कारली, गोबरवाही- गोबरवाही-हेटी, नाकाडोंगरी,
भजेपार मरारिटोला,गायमुख सोनपुरी, सोरणा लांजेरा, पिटेसूर शॉरणा, नाकाडोंगरी चिखला पाथरी, राजापूर चिखला,बाळापूर पवनारखारी, वरठी, करडी मुंढरी, देव्हाडा करडी,
ढीवरवाडा मुंढरी निलज देव्हाडा, पुलिया कान्हाळगाव डोंगरगाव असे कामे मंजूर झाले आहेत.याबद्दल क्षेत्रातील जनतेनी आमदार राजू कारेमोरे यांचे अभिनंदन केले आहे.