Monday, December 23, 2024
Homeराज्यभाजप नेते चरणसिंग ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश...गोंडवाना एक्सप्रेस काटोल-नरखेड येथे आजपासून थांबणार...

भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश…गोंडवाना एक्सप्रेस काटोल-नरखेड येथे आजपासून थांबणार…

नरखेड–14
कोरोना काळापूर्वी काटोल -नरखेड रेल्वे स्टेशनवर सुरु असलेले एक्स्प्रेस गाड्यांचे रेल्वे थांबे कोरोना काळात सर्व बंद करण्यात आले होते. हे थांबे पूर्ववत करण्यासाठी काटोल विधानसभा क्षेत्राचे भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश भाजप अध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे या सर्व नेत्यांच्या मदतीने सुरुवातीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री. रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनीही रेल्वे थाब्याच्या निवेदनावर आश्वस्त केले होते.

दरम्यानच्या काळात ४ ऑक्टोबरपासून नरखेड शहर भाजपच्या वतीने लोकभावनेचा आदर करून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी भाजपचे मनोज कोरडे, शामराव बारई, संजय कांमडे, व इतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले.

या साखळी उपोषण आंदोलनाला भाजप नेते चरणसिंग ठाकूर, जिल्हा संघटनमंत्री किशोर रेवतकर, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष संदीप सरोदे यांनी भेट दिली असता तीव्र जनभावना लक्षात घेऊन आंदोलनातील नेत्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाण्याचे निश्चित झाले .

शिष्टमंडळात भाजप नेते चरणसिंग ठाकूर, यांचे नेतृत्वात उकेश चव्हाण, शामरावजी बरई, संजय कांमडे, मनिश दुर्गे, सुरेश शेंद्रे, रूपेश बारई, यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री. अश्विनजी वैष्णव यांची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली व जनभावना लक्षात आणून रेल्वे थांब्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे मंत्री मा.ना. श्री. अश्विनीजी वैष्णवजी यांनी रेल्वे प्रशासनाला निर्देश दिले आणि अखेर गोंडवाना एक्सप्रेस दिनांक 14 आक्टोबर 2022 पासून नरखेड काटोल रेल्वे स्थानकावर थांबणार असून उर्वरित 4 गाडीचे थांबे नरखेड आणि 3 गाड्यांचे थांबे काटोल येथे पुढील आठवड्यात थांबण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यानी दिले असून वेळापत्रकात समावेश करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले असल्याचे चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: