कल्याण – प्रफुल्ल शेवाळे
नवीन वर्षाच्या सुरुवातीला कल्याण परिमंडळ पोलीस क्षेत्राची भरीव कामगिरी पहाण्यास मिळाली आहे. कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेला 3कोटी 16 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला आहे.. पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थिती मध्ये कल्याण येथे आज सदर ऐवज फिर्यादी नागरिकांना परत करण्यात आला.
चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्या नंतर फिर्यादी नागरिकांना अत्यंत आनंद झाला असून त्यांनी पोलीस विभागाचे आभार मानत, आशीर्वाद देत कौतुक केलं आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारातील नंदन सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला.. यात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी खेटे, सुनिल बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. रोख रकमेच्या स्वरूपात 27लाख 80 हजार रुपये, सोने चांदीचे 1कोटी 15 लाख 40 हजार रुपये, चोरीला गेलेली 51 वाहने, त्यांची किंमत 1कोटी 4 लाख रुपये, चोरीला गेलेले 351 मोबाईल त्यांची किंमत 43 लाख 56 हजार रुपये आणि इतर 25 लाख 48 हजार असा मुद्देमाल पोलीस आयुक्त डुंबरे यांच्या उपस्थिती मध्ये परत करण्यात आला..
मुद्देमाल परत मिळाल्या च्या आनंदात फिर्यादी नागरिकांनी पोलीस त्यांची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडत असून, पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यावेळी माध्यमांसमोर बोलताना आयुक्त डुंबरे म्हणाले की चोरीला गेलेला कष्टाचा पैसा, सोने चांदी, स्त्रीधन दागिने, अशी भावनिक गुंतवणूक असते, मोबाईल, वाहने नागरिकांना परत मिळवून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.पोलिस स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पोलीस दलाचं ब्रीद आहे सद्रक्षणाय, खलनिग्रणाय या ब्रीदाशी प्रामाणिक राहून आपण काम केलं पाहिजे. सध्या पोलिसांच्या कामाचं स्वरूप बदललं आहे…
पूर्वीच्या काळात गुन्हे चोरी, घर फोड्या असायच्या.. आता मात्र सायबर फ्रॉड, ड्रग्ज माफिया अशी अनेक आवाहने समोर आहेत, त्या दृष्टीने आवाहनांचा मुकाबला करण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजेत. आधुनिक तंत्रधान वापरून ते सामान्य जनतेपर्यंत पोहचणे आणि त्यांना मदत करणं हे आपलं ब्रीद असलं पाहिजे अशी भावना आयुक्त डुंबरे यांनी व्यक्त केली आहे.