Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी आणि लायन्स क्लब ऑफ जतच्या...

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी आणि लायन्स क्लब ऑफ जतच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे यांची नियुक्ती…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या अडचणी व विविध प्रश्नांवर आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे कलाशिक्षक सुभाष सदाशिव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीने केली आहे.

सुभाष शिंदे हे कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर म्हणून जत हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये गेली 32 वर्षे आपली सेवा बजावत आहेत. दरम्यान अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राज्य सदस्य, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संघटक, सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, जत तालुका कला संघ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल रामेश्वर चे समन्वयक आदी संस्था आणि संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.

या ब्लॉगवर त्यांनी एक ते दोन हजार बातमीपत्रांचे लेखनही केलंय. तर सुभाष शिंदे या यूट्यूब चैनल वर त्यांनी माहितीपट वजा व्हिडिओंची स्वतः निर्मिती केली आहे. सदर नियुक्ती राज्याचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, राज्य कोषाध्यक्ष सुहास पाटील राज्य उपाध्यक्ष रामचंद्र लिंबेकर आदींच्या राज्य कार्यकारिणी मंडळाने केली आहे.

याचबरोबर लायन्स क्लब ऑफ जतच्या अध्यक्षपदीही 2023- 24 सालासाठी अध्यक्ष म्हणून नुकतीच त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे लायन्स क्लब जतचे संस्थापक लायन डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लायन दिनकर पतंगे आदिंसह लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: