Wednesday, December 25, 2024
HomeSocial Trendingदोन तरुणींना बाईकवर बसवून स्टंट करणे महागात पडले...अखेर पोलिसांनी पकडले...Viral Video

दोन तरुणींना बाईकवर बसवून स्टंट करणे महागात पडले…अखेर पोलिसांनी पकडले…Viral Video

गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता, या व्हिडिओ मध्ये एक युवक दोन तरुणींना मोटरसायकलवर धोकादायक स्टंट करत करीत होता, अखेर पोलिसांनी त्या युवकाची ओळख पटवली असून पोलिसांनी काल रविवारी त्याला अटक केली. आरोपी हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच आरोपीने दोन मुलींसह त्याच्या दुचाकीवर धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहरातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात ही घटना घडली. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करून त्याला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: