Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यविद्यार्थ्यांचे गत वर्षातले अध्ययन तपासणार, जिल्ह्यातील सर्व शाळांत आज पायाभूत चाचणी...

विद्यार्थ्यांचे गत वर्षातले अध्ययन तपासणार, जिल्ह्यातील सर्व शाळांत आज पायाभूत चाचणी…

अकोला – संतोषकुमार गवई

विद्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम आत्मसात केला किंवा कसे, हे तपासण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांतून इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी उद्या, दि. 10 ते 12 जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य आर. पी. खडके यांनी केले आहे.

या चाचणीतील गुण शिक्षकांकडून विद्या समीक्षा पोर्टलवर भरले जातील. अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम दिला जाईल. त्यातून पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमासोबत गत अभ्यासक्रमाचीही उजळणी घेण्यासाठी शिक्षकांना दिशा मिळणार आहे. इयत्ता तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व इंग्रजी या विषयाच्या छापील प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या आहेत. चाचणीदरम्यान ‘डाएट’ व जि. प. शिक्षण अधिकारी शाळांना भेटी देतील. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीसाठी ही चाचणी होत असल्याचे श्रीमती खडके यांनी सांगितले.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: