- टि पॉईंट पासुन घोषणा देत निघाला धडकमोर्चा.
- शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश.
- मागण्यांसंदर्भात दिले निवेदन.
रामटेक – राजु कापसे
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने शैक्षणिक सत्र २०२२ – २३ पासून सर्व अभ्यासक्रमाचे इतर शुल्कात केलेली अवाजवी शुल्क वाढ त्वरित रद्द करण्यात यावी व परीक्षा फार्म शुल्क परीक्षा, प्रक्रिया शुल्क या बाबी रद्द करण्यात येऊन परीक्षा फी रुपये 300 आकारण्यात यावी यासह इतर काही मागण्यांसाठी आज दि. २० सप्टेंबर ला रविकांत रागीट प्रशाषकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शितलवाडी टि पॉईंट येथुन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयापर्यंत विविध मागण्यांची नारेबाजी करीत धडकमोर्चा काढला.
दरम्यान मागण्यांचे एक निवेदन संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव राम जोशी यांना देण्यात आले. यावेळी शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनानुसार दोन वर्षाचे कोरोना काळात बेरोजगारी मुळे तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कामगार शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झालेले आहे. विपरीत परिस्थितीमुळे बेरोजगारी ठेपली असताना व नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना विद्यापीठाने इतर शुल्कात केलेली शुल्क वाढ सर्वांनाच अडचणी वाढविणारी आहे.
यापूर्वीचे विद्यापीठाचे इतर शुल्क रुपये ६६० एवढे आकारण्यात येत होते त्यात वाढ करून विद्यापीठाचे शुल्क रूप अकराशे पन्नास करण्यात आले. यात परीक्षा प्रक्रिया शुल्क विद्यापीठ विकास निधी व इतर शुल्काचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठात राष्ट्रीय उच्च उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ विकास निधी प्राप्त होत असतो असे असतानाही विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ विकास निधी शुल्क आकारणे गैर आहे.
त्याचप्रमाणे इतर शुल्कात विद्यापीठ संगणक शुल्क व परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म भरताना सुद्धा परीक्षा फॉर्म शुल्कही या विविध शुल्क सदराखाली विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी व इतर शुल्क आकारून विद्यापीठ आपली झोळी भरीत आहे. तेव्हा परीक्षा शुल्कात कमी न करता वाढीव शुल्क आकारल्या जात आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत नाही. शैक्षणिक कॅलेंडर मध्ये परीक्षा फी भरण्यास कमी वेळ देऊन विद्यार्थ्यांना कोणतीही संधी व सवलत न देता मोठ्या प्रमाणात लेट फी ची आकारणी करीत असते.
निवेदनानुसार विद्यार्थ्यांच्या मागण्या
१) विद्यापीठाने इतर शुल्कात केलेले वाढ त्वरित रद्द करण्यात यावी
२) विद्यार्थ्यांकडून लेट फी आकारण्यात येऊ नये
३) शैक्षणिक कॅलेंडर मध्ये लेट फी आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा व १५ ते २० दिवसाची मुदत ठेवण्यात यावी
४) लेट फी रुपये ५०/ आकारण्यात यावी
५) विद्यापीठ विकास निधी रद्द करण्यात यावी
६) परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म शुल्क घेण्यात येऊ नये व दोन्ही शुल्क रद्द करण्यात यावे
७) परीक्षा फी रुपये तीनशे करण्यात यावी व लेट फी आकारण्यात येऊ नये
८) फेरमुल्यांकन फी व इतर प्रमाणपत्र करिता आकारण्यात येणारी फी कमी करण्यात यावी
९) महत्त्वाचे बाबीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार यावा