Saturday, December 21, 2024
Homeराज्यसावित्रीबाई फुले विद्यालयाचच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात मारली बाजी...

सावित्रीबाई फुले विद्यालयाचच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात मारली बाजी…

साऊ ढोणे इनलाईन्स स्केटिंग मध्ये विभाग स्तरावर

पातूर – निशांत गवई

पातुर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी खेळामध्ये विविध खेळात आपल्या खेळाचे जोरदार प्रदर्शन करून जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले तर कु.साऊ सचिन ढोणे हिने इनलाइन स्केटिंग स्पर्धेमध्ये 14 वर्ष आतील वयोगटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळून विभाग स्तरावर झेप घेतली आहे.

या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातून कुमारी धनश्री रणजीत इंगळे, 17 वर्ष वयोगटातून गोविंदा परशुराम कौलकर याने प्रथम क्रमांक मिळवला तर 17 वर्ष वयोगटातून कु.नैनसी प्रशांत म्हैसणे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कुमारी पूजा विजय धुळे 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, पवन शंकर अत्तरकार यांनी 110 मीटर अडथळा शर्यत मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी जानवी अनिल श्रीनाथ हीणे कुस्ती या स्पर्धेतून प्रथम क्रमांक मिळवून सर्व विजय विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे.

सर्व विजयी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सपना म्हैसने सचिव सचिन ढोणे मुख्याध्यापक जे.डी कंकाळ क्रीडा शिक्षक पी एम ननीर,एन एस इंगळे तसेच इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आपल्या आई-वडिलांना देतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: