रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे गणेशाेत्सव व संस्कृत महाेत्सवानिमित्य श्रीगणपती-अथर्वशीर्ष व गणपती स्त्राेत्र कंठपाठ स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. त्यामध्ये समर्थ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांनी सहभाग घेत व उत्तम प्रदर्शन करून पारितोषीक व प्रमाणपत्र पटकावले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी म्हणजेच शाळेतील सहभागी सर्व स्पर्धकांनी खुप सुंदर कंठपाठ गणपती अथर्वशीर्ष सादर करुन उपस्थीतांची मने जिंकली. यावेळी परीक्षक म्हणुन संस्कृत विश्वविद्यालयाच्या वेद विभागातील डॉ. राहुल कुमार झा – सहाय्यक प्राध्यापक व डॉ. अमीत भार्गव _ सहाय्यक प्राध्यापक हे उपस्थित होते.
पहीला आणि द्वितीय असे फक्त दाेनच क्रमांक या स्पर्धेत देण्यात आले होते. त्यापैकी दुसरा क्रमांक २८ स्पर्धकापैकी समर्थ शाळेतिल कु. खुशी दांदडे वर्ग ३ रा. हिने पटकावला. उर्वरीत शाळेतिल ४ स्पर्धक आदित्य बंडु टाेपले वर्ग ३रा, जान्हवी दिनेश माकडे वर्ग ३ रा, ओम प्रशांत बावनकर वर्ग ४ था, तृनिका तुषार धमगाये वर्ग ४ था यांना उकृष्ट सादरिकरणाकरिता प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात आले.
दरम्यान या सर्व विजेत्यांचा दुसऱ्या दिवशी शाळेत सुद्धा सत्कार करण्यात आला. समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुंढरे मँडम यांनी या सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षकगण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.