शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळेतील 109 विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण जेवल्यानंतर विषबाधा झाली असल्याची माहिती हाती येत आहे… बाधित विद्यार्थ्यांना शहापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे…
तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज अनुदानित आश्रम शाळा आहे.. आज दुपारी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील जेवण न देता गावात एक उत्तरकार्याचे जेवण होते ते जेवण विदयार्थ्यांना देण्यात आले आणि याच जेवणातून एकूण 109 विद्यार्थ्यांना पोटामध्ये अचानक त्रास सुरु झाला… जेवणातून विषबाधा झाली असल्याची माहिती हाती येतेय..
यात मुले 46 तर 63 मुली यांचा समावेश आहे.. याच दरम्यान विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आले.. आता सद्य स्थिती मध्ये विदयार्थ्यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती हाती येत आहे..
पण घटने नंतर या विदयार्थ्यांना आश्रम शाळेतील कुणीही कर्मचारी, शिक्षक भेटी साठी आलेले नाहीत.. या वेळेस शाळेच्या कर्मचारी वर्गावर कारवाई करण्यात यावी याकरिता गावातील ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी यांच्या मध्ये बाचाबाची झाली असल्याचे उघड झाले आहे..