अकोला – दिनांक 15 ऑगस्ट 2024. 78व्या स्वातंत्र्य दिना निमित्त प. स. मूर्तिजापूर अंतर्गत जी. प. प्राथ. केंद्र शाळा कानडी येथे सार्थक क्रीडा आरोग्य शिक्षण बहुउद्देशीय संस्था अकोला ,आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्था अकोला, व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग1ते 7वीच्या 209 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले तसेच ज्ञानप्रकाश विद्यालय कानडी येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून संविधान व प्रमांपात्र देऊन सत्कार करण्यात आले. तसेच कानडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. अशोक अमानकर (अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण )अकोला हे होते. प्रमुख मार्गदर्शक-मा. डॉ. मीनाक्षी गाजभिये (एम. डी.रेडियोडेग्रोसिस) अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, मा.डॉ. कुमारस्वामी शि.र.(भा.व.से.) उपवनसंरक्षक( प्रादेशिक) वन विभाग अकोला, मा. संदीप कुमार शंकरराव अपार,