सावित्रीबाई फुले विद्यालयात बाल आनंद मेळावा…
पातुर – सचिन बारोकार
पातुर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजीशाळेच्या प्रांगणात सकाळी 8:00 ते 12:00 वेळेत या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल आनंद मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सुरेश राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने, संस्थेचे सचिव सचिन ढोणे विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.डी. कंकाळ तसेच पालक वर्गाची उपस्थिती होती या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव सचिन ढोणे यांनी केले.
बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक शिक्षणाची मुल्ये रुजवली जात असूनअसा उपक्रम शाळेमध्ये दरवर्षी राबवला जातो तसेच वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक शिक्षणातून नफा तोटा हे प्रामुख्याने स्वतःच्या स्टॉलवर केलेल्या विक्रीतूनअनुभवास मिळते.
प्राप्त झालेल्या नफ्याची रक्कम विद्यार्थी स्वतः शाळेतील किलबिल बचत बँक मध्ये जमा करतात व त्यांना पुढील शैक्षणिक बाबीसाठी लागणारी रक्कम ही त्या किलबिल बचत बँक मधून आपल्या शैक्षणिकगरजा पूर्ण करण्यासाठी वापरतात या संपूर्ण बाल आनंद मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारून विद्यार्थ्यांचा व पालकांचा भरपूर प्रतिसाद पाहवयास मिळाला आज झालेल्या बाल आनंद मेळाव्यामधून जवळपास 15 ते 20 हजाराची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदर मेळाव्याचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.