पातुर – निशांत गवई
पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बिस्किट बनवण्याच्या कारखान्याला भेट देऊन बिस्किट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. नुकतेच खामगाव येथील पारले बिस्कीट कारखान्याला भेट देण्यात आली.
स्पॉट व्हिजिट एज्युकेशन या उपक्रमांतर्गत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल दरवर्षी विविध क्षेत्रीय भेटीचे आयोजन करीत असते. यावर्षी इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रक्षेत्र भेट हा उपक्रम नुकताच घेण्यात आला.
यामध्ये खामगाव येथील पार्ले बिस्कीटच्या कारखान्याला विद्यार्थ्यांनी भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांना बिस्कीट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आली यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. याप्रसंगी पार्ले बिस्कीट कारखान्याचे स्कूल कॉर्डिनेटर राजकुमार दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना बिस्किट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून मार्गदर्शन केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवून प्रोडक्शन आणि मार्केटिंग याबाबत माहिती दिली. यावेळी शाळेचे शिक्षक अविनाश पाटील, वंदना पोहरे आदी उपस्थित होते.