Sunday, December 22, 2024
Homeराज्यविद्यार्थ्यांनी अनुभवली खरीखुरी निवडणूक | पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये ई व्ही एम...

विद्यार्थ्यांनी अनुभवली खरीखुरी निवडणूक | पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये ई व्ही एम व्दारे मतदान…

पातूर – निशांत गवई

पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मध्ये अगदी खरी खुरी निरागस निवडणूक पार पडली. यामध्ये प्रचार होता, ई व्ही एम होते, आणि निवडणूक जिंकल्यानंतरचा आनंदही होता. नव्हते मात्र धूर्त राजकारण..!

विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया समजावी यासाठी पातुर च्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया राबवत असते. या शैक्षणिक सत्रासाठी नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये आचार संहिता, नामांकन अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप, प्रचार करणे आदी माहिती या उपक्रमबाबत देण्यात आली. यांनतर निवडणूक केंद्र उभारण्यात आले. यावर्षी विद्यार्थ्यांनी ईव्हीएम एप च्या साहाय्याने मतदान केले.

यामध्ये प्रत्येक क्लास मधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे दोन प्रतिनिधी निवडून देण्यात आले. निवडून आलेल्या उमेदवारांचे तहसीलदार राहुल वानखडे, नायब तहसीलदार अजय तेलगोटे, गजानन वैराळे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी स्वागत केले. यांनतर विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

यामध्ये विजयी झालेले उमेदवार इयत्ता पहिली मधून स्पंदन गाडगे, श्रीया कढोणे, इयत्ता दुसरी मधून प्रणित डिवरे, ईश्वरी जायभाये, इयत्ता तिसरी मधून सर्वेश गव्हाळे, आर्वी उगले इयत्ता चौथी मधून अन्वी इंगळे, ऋत्विका बोचरे इयत्ता पाचवीमधून समर्थ पाटील, पूर्वी उगले, इयत्ता सहावी मधून ओम जाधव, अपूर्वा गाडगे, इयत्ता सातवी मधून क्षितिज वानखडे, शर्वरी दळवे,इयत्ता आठवी मधून प्रसाद जायभाये ,नमिषा सुगंधी इयत्ता नववी मधून साहिल पवार, श्रावणी गिऱ्हे तर इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मधून सिद्धांत वानखडे, श्रुती तायडे यांची अविरोध निवड केली.

या निवडणुक प्रक्रियेत केंद्राध्यक्ष म्हणून अनिकेत घुगे, हर्षल वानखडे यांनी काम पाहिले, तर मतदान अधिकारी म्हणून, अंजली हिरळकार, प्रशिका खंडारे, मनस्वी जाधव, प्रणव कांबळे, अंकित पाटील, ऋषिकेश मृग यांनी काम पाहिले. सुरक्षा व्यवस्था सार्थक शेंडे याने पहिली.

निवडणूक यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरीश सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकडे, धनश्री माळी, स्वाती वालोकार, प्रियंका चव्हाण, पूजा मोरे, प्रचाली थोराईत , माधुरी ताले, शितल गुजर, ऋतुजा राऊत , नेहा उपर्वट, रूपाली पोहरे, सुजाता पोहरे, शुभम पोहरे यांनी प्रयत्न केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: