शेगाव – अमोल साबळे
अकोट महामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे या महामार्गावर नया अंदुरा कारंजा रम फाटा लगत जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा व जिल्हा परिषद शाळा महामार्गाला लागून असून विद्यार्थीना शाळेमध्ये जाण्यासाठी जीवमुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
अनेक गावाहून खेड्यातून विद्यार्थी येतात यामुळे या महामार्गावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ आहे. भरधाव वेगाने वाहने चालवत असून या फाट्यावर अनेक अपघात घडले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही गतिरोधक बसविण्यास संबंधित कंपनीनेचे विसर पडला आहे.
यात प्रामुख्याने या दोन्ही बाजूंना गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. परिणामी गतिरोधक नसल्याने अनेक चारचाकी आणि दोनचाकी वाहने सर्रास वेगाने आपली वाहने चालवित असतात.
त्यामुळे अनेकदा वाहने वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात घडले असून, अनेक वाहनचालक जखमी झाले असून, काहींच्या जिवावरदेखील अपघात ओढवला असून, या दोन्ही बाजूला संबंधित कंपनीने तत्काळ गतिरोधक बसवावे जेणे करून अपघातांच्या घटना बंद होतील अशी मागणी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद पालक वर्ग तसेच परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.