Sunday, December 22, 2024
Homeराज्यसिटु, शेतमजूर युनियन व किसान सभेचे रामटेक येथे जोरदार निदर्शने...

सिटु, शेतमजूर युनियन व किसान सभेचे रामटेक येथे जोरदार निदर्शने…

रामटेक – राजु कापसे

सिटू , किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे रामटेक येथील गांधी चौकात ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महागाई , बेरोजगारी , शेतकरी , शेतमजूर व कामगारांचा प्रश्नांना घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.

जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जी.एस.टी मागे घ्या , पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंवरील भाववाढ मागे घ्या , महागाई व बेरोजगारी वर आळा घाला , सरकारी शिक्षण व आरोग्य सेवा मजबूत करा ,शेतकरी , शेतमजुर व ग्रामीण श्रमिकांना पेन्शन, किमान वेतन व अन्य सामाजिक सुरक्षा प्रदान करणारा केंद्रीय कायदा करा, योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या या प्रमुख मागण्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी ,

भगतसिंग , पंडित जवाहरलाल नेहरू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहित अनेक महापुरुषांचा नेतृत्वात शेतकरी , कामगार , विद्यार्थी व सामान्य जनतेच्या एकजुटीने भारताने हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. पण आज देशाच्या अमृत महोत्सव वर्षी धर्मनिरपेक्ष , लोकशाही , संविधानिक , समाजवादी , संघराज्यत्मक मूल्यांचे रक्षण करणे , जनतेचे लोकशाही व नागरी अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढा मजबूत करण्याचे आवाहन आपल्या समोर आहे असे विचार कॉ. राजू हटवार यांनी यावेळी व्यक्त केले.

निदर्शनात किसान सभेचे कॉ. राजू हटवार , शेतमजूर युनियन चे अध्यक्ष भीमराव गोंडाने , सिटू च्या कल्पना हटवार , गौतम नाईक ,महादेव टेकाम, गणिता मेश्राम , सुनीता मोरेशिया , माया लोंढे , वैशाली ठवरे , मंगला गायधने , रुपा दमाहे , सुरेखा अडकणे , आम्रपाली वांढरे सहित अनेक जण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: