Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedओबीसींचा अपमान करणाऱ्या संविधानविरोधी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात भाजपचे जोरदार निदर्शने...

ओबीसींचा अपमान करणाऱ्या संविधानविरोधी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात भाजपचे जोरदार निदर्शने…

खामगाव – हेमंत जाधव

न्यायालय व भारताचे संविधान विरोधात कृती करणारे तसेच ओबीसी समाजाचा अपमान करणारे राहुल गांधी व काँग्रेस पक्ष विरोधात आज खामगावात भाजपचे वतीने निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज 25 मार्च रोजी स्थानिक टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले.

“सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते”असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी “मोदी”या अडणावावरून अपमानास्पद टिप्पणी करतांना ओबीसी समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याचा ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करत असलेल्याकाँग्रेस व गांधी घराण्याचा या कृत्याचा तीव्र निषेध आज भाजपच्या वतीने करण्यात आला. यावेळी राहुल गांधी व काँग्रेस पक्षविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ,

डॉ एकनाथ पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, माजी नगरसेवक राजेंद्र धनोकर, सतीशआप्पा दुडे, राकेश राणा, गणेश जाधव, विलास देशमुख, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राज टिकार, गणेश जाधव, शांताराम बोधे,विलास काळे, जितेंद्र पुरोहित, ओमसेठ खंडेलवाल, अशोक हत्तेल, हरसिंग साबळे, दत्ता जवळकार, संतोष येवले, वैभव डवरे, संतोष टाले, सुभाष इटणारे,

शेखर कुलकर्णी, विनोद टिकार, अनिल कुळकर्णी, अमोल राठोड, रमेश इंगळे, वसंतराव वानखडे, प्रल्हाद नेमाने, सुधीर खवले, आशिष सुरेका , अनिस जमादार, संदीप राजपूत, संतोष घोराडे, रोशन गायकवाड, रुपेश शर्मा, हितेश पदमगीरवार, आदि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: