सांगली – ज्योती मोरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची आज ईडी कडून चौकशी केली जात आहे ,या विरोधात आज सांगलीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी करून बोंब ठोकली.
यावेळी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, उत्तमराव कांबळे, अर्जुन कांबळे, डॉ.शुभम जाधव, महालिंग हेगडे, अक्षय शेंडगे, अनिता पांगम, ज्योती अदाटे,छाया जाधव,संगीता जाधव ,सुरेखा सातपुते,विनायक हेगडे, उमर गवंडी,संजय सर्वदे,युवराज गायकवाड,आदिं सह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.