राज्यात उच्च माध्यमिक सुरु असून बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या मोठ्या बातमीने संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलय, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील बारावीच्या गणिताचा पेपर आज सकाळी 11 वाजता सुरु होण्याआधीच फुटला. याचे तीव्र पडसाद सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले असून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सत्ताधाऱ्यांवर भडकले.
आज 11 वाजता पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे 10 वाजून 30 मिनिटांनीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचे पडसाद थेट विधीमंडळामध्येही उमटले. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी या पेपरफुटीसंदर्भात संताप व्यक्त करताना, सरकार झोपलेलं आहे का असा प्रश्न विचारला. तसेच राज्याच्या माजी शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी वारंवार असे प्रकार घडत असल्याचं नमूद करत 10 मिनिटंआधी पेपर द्यायचा नाही असा नव्या सरकारने नियम बनवला असताना अर्धा तास आधी पेपर फुटलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला आहे.
उदय सामंत वगैरे सगळे सभागृहात आहेत. आत्ता सिंदखेडराजा परिसरात बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. ते रॅकेट आहे की काय आहे? अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळं आहे. सरकार काय करतंय मला काही कळत नाही. सरकार झोपलंय की काय? मग पुन्हा तुम्हा म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचं नुकसान आहे. मध्येही एका पेपरचं तसंच झालं….