Sunday, December 22, 2024
Homeराज्यमराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आकोटात कडकडीत बंद…व्यापाऱ्यांनी केले पूर्ण सहकार्य…

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आकोटात कडकडीत बंद…व्यापाऱ्यांनी केले पूर्ण सहकार्य…

आकोट – संजय आठवले

जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूटपणे अमानुष लाठी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी पुकारलेल्या आकोट बंदला व्यापारी बांधवांनीही पूर्ण सहकार्य केल्याने आकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

या दरम्यान आकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांतर्फे काही वेळ धरणे देऊन निदर्शने करण्यात आली. वर्तमान शासन व पोलीस प्रशासनाच्या अमानुष कृत्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून निषेध पदयात्रा काढली.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अंतरवाली येथील मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावर माजी आमदार संजय गावंडे, कृउबास सभापती प्रशांत पाचडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलीप बोचे, वंचित आघाडी नेते प्रदीप वानखडे, ॲडवोकेट मनोज खंडारे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चोरे, पर्यावरण सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास गोंडचर,

वंचित आघाडी तालुका अध्यक्ष चरण इंगळे, वंचित आघाडी युवा नेता दीपक बोडखे, अरुण जवंजाळ, राजेंद्र पुंडकर, कुलदीप वसु, सुशिल फुंडकर, अनंत सपकाळ, संजय पुंडकर, चंद्रशेखर बारब्दे, शिरीष पोटे, अविनाश डिक्कर, प्रवीण डिक्कर ,मनीष कराळे, सुगत वानखडे, अक्षय तेलगोटे, शाम गावंडे, सतीश हांडे, सौ. मंदाताई कोल्हे,

सौ. माया म्हैसने, विलास साबळे, अतुल म्हैसने, बंडू उर्फ प्रदीप कुलट, बंडू बोरोकार, अनिकेत कुलट, सुभाष तेलगोटे, सय्यद शरीफ राणा, विशाल आग्रे, मुकेश निचळ, पंजाबराव पाचपाटील, प्रदीप गावंडे, गौतम पंचांग, शिवचरण बाणेरकर, हरीश जेस्वानी, सुनील गावंडे, निवृत्ती वानखडे, सदानंद तेलगोटे, जे पी बोरकर, अविनाश गावंडे,

बी आर साबळे, शालिग्राम शालिग्राम ठाकरे, नंदकिशोर वसु, दिनेश सरकटे, स्वप्निल वाघ, संदीप पाथरे, मुकेश ठोकळ, सुनील कटाळे, प्रकाश महाले, रंगनाथ मिसळे, भैय्या महाले, प्रवीण खवले, प्रशांत हिंगणकर, सुनील काळुंखे, राजेंद्र सपकाळ, संदीप बोबडे, विनायक वानखडे, प्रफुल्ल आवटे, सुनील देशमुख, प्रवीण बाणेरकर,

प्रवीण राऊत, विलास भारसाखळे, ज्ञानेश्वर मानकर, विनोद नेमाडे, रमेश मिसाळ, विक्रम जायले, पिंटू पालेकर, श्रीकांत साबळे, पंकज ठाकरे, अनिकेत गिरनाळे, राजू ठोकळ, अविनाश गावंडे, दिलीप गावंडे, जम्मू पटेल, तसलीम मिर्झा, ज्ञानेश्वर कुलट, सतीश डिक्कर, आकाश सरोदे, सदानंद डिक्कर, मंगेश भोसले, अविनाश जायले,

महादेव आवारे, रविंद्र रेळे, किरण साबळे, वाल्मीक भगत, राजू पंडित, योगेश आगरे, निलेश झटाले, शत्रुघ्न नितोने, निलेश नहाटे, गणेश नहाटे, सचिन सरकटे, विशाल देशमुख, अखिल देशमुख, प्रदीप सावरकर, विजय देशमुख, किशोर देशमुख, संतोष दिवनाले, संदीप वालसिंगे, रमेश खेडकर,

विजय विटनकर, सौरभ येवले, शुभम नारे, राजू चौधरी, गोपाल लोखंडे, राजेंद्र पाचडे, श्रेयश चौधरी, आकाश चव्हाण, विशाल भगत, राहुल कुलट, अक्षय जायले इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: