महेंद्र गायकवाड, नांदेड
शांततापूर्ण गणेश उत्सव ही नांदेडची ओळख आहे. येथील विविध धार्मिक स्थळातून संहिष्णुतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीचा गणेश उत्सव सर्व नांदेडकर तेवढ्याच जबाबदारीने व आनंदाने साजरा करतील. कोणीही कायदाचा भंग करणार नाही याची मला खात्री असून सोशल मिडियावर पोलीसांचा कडा पाहरा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. काल डॉ.शकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
गत एक वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यात किमान एक हजारावर व्यक्तींना आपण सोशल माध्यमाच्या गैर वापराबद्दल कारवाई केली आहे. हे तरुणांनी लक्षात घेऊन अधिक सकारात्मक सामाजिक काम करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डीजे सारख्या वाद्यांना बंदी आहे. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींना अटकाव करण्यात आला आहे. लोकांनीच कायदा समवेत स्वयंशिस्त पाळून प्रदूषण मुक्त व पर्यावरणयुक्त गणेश उत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.