मुर्तिजापूर : भयानक अश्या कोविड कालावधी मध्ये फूटपाथ रस्त्यावर लहान मोठे उद्योग करणारे पथ विक्रेता यांची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली होती अश्याच विकट परिस्थितीत कोलमडलेल्या या पथ विक्रेत्यांना जोशाने त्यांचा व्यवसाय पूनर उभारणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रधान मंत्री आत्मनिर्भर निधी (पि एम स्वनिधी) ही योजना सुरू केली होती. नगर परिषद, मुर्तिजापूर जिल्हा अकोला येथे केंद्र शासन पुरस्कृत पि एम् स्वनिधि योजना यशस्वीरित्या राबविली जात असून याच धर्तीवर “स्वानिधि से समृध्दी” या योजने करीता मुर्तिजापूर शहराची निवड करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध आठ योजनेचा लाभ पात्र पथविक्रेता लाभार्थी व त्यांचे कुटुंबातिल सदस्यांना मिळणार आहे.
दिनांक 3 डिसेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मुर्तिजापूर येथे प्रलंबीत दुसरा टप्पा लोन रू 20 हजार चे वितरण करण्यात आले, तसेच स्वनिधी महोत्सव निमित्त प्राप्त व प्रलंबीत परिचय बोर्ड चे वितरण पथविक्रेता लाभार्थी यांना करण्यात आले. आज रोजी मुर्तिजापूर नगर परीषद ला एकूण 597 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 519 कर्ज प्रस्ताव बँकांनी मंजूर करून 494 लाभार्थींना कर्ज वितरण झाले असून त्यामध्ये प्रथम कर्ज रू 10 हजार हे 354 लाभार्थींना, द्वितीय कर्ज रू 20 हजार 131 लाभार्थींना व तृतीय कर्ज रू. 50 हजार 9 लाभार्थींना आज पर्यंत वितरित करण्यात आले , या करीता शहरातील सेंट्रल बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक ,बँक ऑफ बडोदा, कडून कर्ज वितरणासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.
विशेष बाब म्हणजे उत्कृष्ट कामगीरी बद्दल मुर्तिजापूर नगर परिषद ही पी एम स्वनीधी योजने करीता महाराष्ट्रातून एकमेव अशी पिएम् अवॉर्ड लिस्टेड नगर परिषद असून पिएम स्वनीधी महोत्सवा करीता सुध्दा निवड करण्यात आलेली एकमेव नगर परीषद आहे याचं धरतीवर स्वनीधी से समृध्दी या योजने अंतर्गत समाविष्ट असलेल्या आठ योजनाचा लाभ देण्याकरिता मुर्तिजापूर नगर परीषद ची निवड करण्यात आली असून स्वनीधी योजने अंतर्गत कर्ज लाभ घेतलेल्या पथविक्रेता लाभार्थींना व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना या आठ योजना सोबत जोडून त्याचा लाभ देण्यात येणार आहे ,त्या मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना,प्रधानमंत्री जनधन योजना,प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना,प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना , वन नेशन वन रेशन कार्ड , बांधकाम शेत्रातील मजुरांची नोदणी व त्यांना विवीध लाभ अश्या विविध आठ योजनाचा समावेश या अभियानात आहे , या करीता लवकरच स्वानीधी योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या पथविक्रेता लाभार्थी यांचे ऑनलाईन फॉर्म भरून सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती या योजनेचे विभाग प्रमुख व सहा. प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी दिली.
स्वनिधीं योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रलंबीत असलेल्या पात्र पथविक्रेता लाभार्थी यांनी प्रथम कर्ज रू 10 हजार घेण्यासाठी आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे व ज्यांनी प्रथम कर्जाची नियमित कर्ज परतफेड केली आहे अश्या लाभार्थी यांनी द्वितीय कर्ज रू 20 हजार व तृतीय कर्ज रू 50 हजार करीता आपले अर्ज सादर करावे , कर्ज मिळालेल्या पथविक्रेत्यांना आवाहन करण्यात येते आहे की जे पथ विक्रेते नियमित कर्ज परतफेड करतील अश्याना 7 टक्के व्याजावरील अनुदान मिळणार आहे तसेच जे पथ विक्रेते आपल्या ग्राहका कडून पेमेंट घेतांना बँके कडून देण्यात आलेल्या क्यू – आर कोड चां वापर करून जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करतील अश्याना महिन्यात 1000 रु चे व्यवहार केल्यास 100 रु पर्यंत कॅश बॅक मिळणार असल्याने सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नगरपरिषद मुर्तिजापूर डे एन यु एल एम विभाग येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी केले आहे. तसेच शासनाकडून पथ विक्रेत्यांना कायम स्वरुपी एका निश्चित जागे वर व्यवसाय करण्याकरिता वेंडीग झोन ची निर्मिती करण्याचे या योजने अंतर्गत प्रस्तावित असल्याचे त्या करीता जागा उपलब्ध झाल्यास तसा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.