Sunday, December 22, 2024
Homeराज्यअर्थ सांख्यिकीचे अजबच निकाल...स्वतःचे गुण जाणून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढावे लागेल...

अर्थ सांख्यिकीचे अजबच निकाल…स्वतःचे गुण जाणून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढावे लागेल का..?

बिलोली – संजय जाधव

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे नुकतेच निकाल लावण्यात आले, परीक्षा ही आयबिपिएस कंपनीकडून घेण्यात आली होती.आयबीपीएस कडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परिक्षचे निकाल हे वेगळ्या पद्धतीने लावण्यात येतात.मात्र अर्थ सांख्यिकीचे निकाल मात्र अजबच लावण्यात आले असून एकंदरीत रित्या परीक्षार्थींची थट्टाच करण्यात आले असल्याचा आरोप युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केला आहे.

आता पर्यंत तीनदा वेगवेगळ्या पद्धतीने निकाल लावण्यात आले. पहिल्यांदा पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली हा निकाल पाहून सोशल मीडियावर परीक्षार्थींचा विरोध पाहता पुन्हा दुसऱ्यांदा निकाल लावण्यात आले.त्यातही केवळ पात्र उमेदवारांची गुणासह यादी लावण्यात आले.

त्यातही पुन्हा चूक झाल्याने परीक्षार्थीं संतप्त झालेले पाहून तिसरी यादी लावण्यात आली.त्यात पुन्हा थोडासा बदल करण्यात आला असून तिसऱ्या यादीत पात्र उमेदवारांचे लिंग आणि आरक्षित असा बदल करण्यात आला आहे. तीनदा निकाल लावूनही ती अपूर्णच असून त्यात परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींची यादी मात्र अद्यापपर्यंत लावले नसून पुन्हा यासाठी मा.न्यायालयात धाव घ्यावी लागेल का असा इशारा युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी दिला आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क,आणि अन्वेषक गट क असे सर्व संवर्ग मिळून २६० वरील पदांसाठी जाहिरात काढण्यात आले होते. त्याची परीक्षाही घेण्यात आली असून नुकतेच अर्धवट निकाल लावण्यात आले.

आयबीपीएसने इतर विभागाचे निकाल ज्या प्रमाणे लावले आहेत त्याच प्रमाणे अर्थ सांख्यिकी विभागाचे निकाल का लावले नाहीत ? असे अर्धवट निकाल लावण्याचे कारण काय? याचे स्पष्टीकरण अर्थ सांख्यिकी विभागाने परीक्षार्थीना देण्याची अत्यंत गरज आहे.परीक्षा देऊन परीक्षार्थीना किती मार्क्स मिळाले हेच जर काळात नसेल तर त्या निकालाचा काय उपयोग ? परीक्षा देण्यासाठी एक हजार रुपये कशासाठी घेतले आहे.

अशा प्रकारचा संतप्त सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत. सर्व परीक्षार्थीचे निकाल आयबीपीएस पॅटर्न प्रमाणेच लावण्यात यावे जेणेकरून प्रत्येकाना आपापले मार्क सविस्तर कळतील अन्यथा आम्हाला आमचे मार्क जाणून घेण्यासाठी तुमच्या विरोधात कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे असा इशारा कलमुर्गे यांनी दिला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: