Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsसेल्फिसाठी थांबले आणि घात झाला...बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार...आरोपी फरार

सेल्फिसाठी थांबले आणि घात झाला…बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार…आरोपी फरार

राज्यात कधी न ऐकलेल्या घटना घडत असल्याचं दिसत आहे, महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना बुलढाणा येथील राजूर घाटात काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. एका 35 वर्षीय महिलेवर आठ जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या महिलेला मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिच्याकडील 45 हजार रुपयेही लुटून आरोपी फरार झाले आहेत. पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी या त्यांच्या गावी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आठजणांचं टोळकं आलं. त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर या महिलेला दरीत ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजुर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे एक महिला आणि तिचा नातेवाईक मित्र देवीच्या मंदिर परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली.

त्याच्यासमोर सदर महिलेलाही चाकूचा धाक दाखवून तिच्यावर आठ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. तशी तक्रार या तरुणाने बोराखेडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान बोराखेडी पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी, बुलढाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: