पातूर – निशांत गवई
कृषी, दुकाने, मेडिकल, औषधीची दुकानांमध्ये एमआरपीच्या माध्यमातून ग्राहक, यांचे बाबत त्यांच्या हक्काबाबत अनियमित्ता केली जात आहे, तिला वेळीच आळा घालण्याच्या हेतूने आज 27 मे 2024 रोजी अ. भा. ग्राहक पंचायतच्यावतीने पातुर तहसीलदार कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले.
यावेळी पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांना लेखी निवेदन देण्यात आले. या संदर्भात माननीय उपभोक्ता मामले मंत्री, उपभोक्ता मामले, खाद्य एवं सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार, कृषि भवन, नवी दिल्ली यांनाही जिल्हाधिकारी यांचे मार्फत ग्राहक पंचायत चे वतीने निवेदन पाठविण्यात आले आहे.
पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांना निवेदन देताना पातुर तालुका प्रमुख देवानंद गहिले, पातूर तालुका संघटन मंत्री डॉ. श्रीकांत बोरकर, प्रा. प्रशांत निकम
सह संघटन मंत्री, पातुर तालुका महिला प्रमुख प्रा. सौ. करुणाताई विठोबा गवई , श्रीमती भारतीताई गाडगे पातुर तालुका उपाध्यक्ष, गोपाल चतरकर, चंद्रशेखर सुगंधी, सुहास देवकर, उपस्थित होते.