प्रियाताई पाठक यांचे मोलाचे मार्गदर्शन
मालेगाव – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानअंतर्गत. उमेद प्रभाग संघ. तेजस्विनी ग्रामसंगम.तथागत समूह मेडशी येथे. मा मुख्य कार्यकारणी अधिकारी वैभव वाघमारे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक. मा किरण कोवे.जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री सुधीर खुजे. यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत उमेद अभियाना मार्फत महिलांना लखपती दीदी बनविण्याच्या दृष्टीने महिलांचे उद्योग व्यवसाय करणे.
यामध्ये वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये करणे व त्यांना स्वतः उपजीविका करण्यासाठी उमेद अभियान कार्य करीत आहे यामध्ये मेडशी येथील. चाळीसच्या वर महिलांनी समूह तयार केले आहे विविध प्रकारचे व्यवसाय करीत असून यामध्ये शेळीपालन. पापड उद्योग. किराणा दुकान.स्वस्त धान्य दुकान. मसाले. दुग्ध व्यवसाय.कटलरी.शिलाई काम.
असे वेगवेगळे प्रकारचे सर्व समूहाणे व्यवसाय सुरू आहेत यासाठी.तालुका व्यवस्थापक. विनोद कराळे. प्रभाग समन्वय. सदानंद राऊत MCRP. प्रियाताई पाठक.MCPR. आशाताई तायडे.CPR. लक्ष्मीताई गौरे.लताताई जाधव. संजीवनी राठोड. गीताताई बिबे. शारदा भागवत.यावेळी उपस्थित होत्या.