Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingडिस्पोजेबल ग्लास पासुन साकारली गणरायाची मुर्ती, रामटेक येथील डॉक्टर अंशुजा किंमतकर यांची...

डिस्पोजेबल ग्लास पासुन साकारली गणरायाची मुर्ती, रामटेक येथील डॉक्टर अंशुजा किंमतकर यांची कलाकृती…

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील रहीवाशी असलेल्या तथा पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ.अंशूजा किंमतकर यांनी आपल्या कल्पकतेतुन डिस्पोजेबल ग्लास पासुन गणरायाची मुर्ती साकारत आपली एक आगळी वेगळी कलाकृती नागरिकांपुढे ठेवली.

याबाबद त्यांनी दिलेल्या महितीनुसार त्यांना अक्षरातून गणपती व कोणत्याही वस्तू पासून गणपती साकारायची खूप आवड आहे. म्हणून यावर्षी इको फ्रेंडली गणपती बनवायचा असं त्यांनी ठरवलं व त्या कामाला त्या लागल्या. त्यासाठी त्यांनी डिस्पोजेबल कागदाचे ग्लास जमा केले आणि या ग्लास पासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारायची ठरवलं,

आताच आपण भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटामाटात साजरा केला तेव्हा त्याअणुषंगाने डाॅ. अशुजा यांनी ठरवलं की यावेळेस आपले गणपती बाप्पा सुद्धा आपल्या भारताचे तिरंग्या सारखे असावेत. म्हणून भारताच्या झेंड्याचा रंग व इको फ्रेंडली गणपती साकारता यावे म्हणून डिस्पोजेबल कागदाचे ग्लास वापरून गणपती बाप्पांची मूर्ती साकारली. या गणपतीची त्यांनी शहरामध्ये असलेल्या त्यांच्या दवाखान्यात किंमतकर हॉस्पिटल इथे स्थापना केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: