पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखूटा येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी पत्रकार संघटनेकडून २७ मे रोजी तहसीलदार यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, हल्लेखोराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, रेतीचे उत्खनन बाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना २६ मे रोजी घडली, याप्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख, यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पत्रकार संघटनेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
…या पत्रकारांनी दिले निवेदन
शंकरराव नाभरे,उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, मोहन जोशी, अब्दुल कद्दूस शेख, निशांत गवई सतीश सरोदे, सचिन ढोणे, प्रमोद कढोने, सचिन मुर्तडकर, श्रीकृष्ण शेगोकार, निखिल इंगळे, संगीताताई इंगळे, पंजाब इंगळे, दीगांबर खुरसूडे, दुले खान, गोपाल राठोड, आदींनी निवेदन दिले आहे.