Saturday, November 23, 2024
Homeराज्यपत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन, कठोर कारवाईची मागणी...

पत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन, कठोर कारवाईची मागणी…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकाराच्या वतीने २८ मे रोजी मा.तहसीलदार मुर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून ,हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रेतीचे उत्खनन बाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहूल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना २६ मे रोजी घडली याप्रकरणी पत्रकार राहूल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांन्नी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मुर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटने कडून मा.जिल्हाधिकारी अकोला, मा. पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे, मा. तहसीलदार मुर्तिजापूर यांना निवेदन देतेवेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर ,प्रा. एल डी सरोदे, संभाजी देशमुख, अंकुश अग्रवाल ,गौरव अग्रवाल ,प्रतीक कुरेकर ,शाम वडसकर, अजय प्रभे ,अनिल अग्रवाल, संतोष माने ,समाधान इंगळे, नागोराव तायडे, धनराज सपकाळ, देवानंद जामनिक ,स्वप्निल गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: