Monday, December 23, 2024
Homeराज्यसंजयनगर १०० फुटी रोड वरील दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार हलवण्यास विरोध...

संजयनगर १०० फुटी रोड वरील दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार हलवण्यास विरोध आयुक्त सुनील पवार यांना निवेदन…

सांगली – ज्योती मोरे.

गेली पंचवीस वर्षांपासून संजयनगर १०० फुटी रोडवर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो यांचा उपयोग संजयनगर व जवळपासच्या हजारो नागरिकांना होतो. चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे नवीन बांधकाम चालू आहे, त्यामुळे माधवनगर सांगली रस्ता बंद करणेत आला आहे व ती वाहतूक संजयनगर मार्गे वळविण्यात आली आहे.

तरी आता हा या वाहतुकीसाठी वर्षोनुवर्षे फक्त बुधवारी भरणारा बाजार दुसरीकडे भरवण्याचे प्रशासनाच्या कडुन हालचाली चालू असल्याने समजते. पण ते नागरिकांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे आहे.

संजयनगर येथे वाहतुक वळविण्याच्या दूष्टीने अजुनही पर्यायी खुप रस्ते आहेत. त्याचा वापर करण्यात येऊन योग्य ते वाहतुकेचे नियोजन करावे‌.

संजयनगर मधील १०० फुटी रस्त्यावरील बुधवार बाजार हलवण्यास स्थानिक नागरिक आठवडा बाजारातील सर्व विक्रेते यांचा विरोध आहे तरी यासाठी आयुक्त सुनील पवार यांना व जिल्हा पोलिस वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले.

यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासित केले. यावेळी माजी नगरसेवक मा रमेशजी सर्जे , सतिशजी फोंडे,शिवाजी चोरमुले, गोविंदजी सरगर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: