Monday, December 23, 2024
Homeराज्यनरखेड बस स्टॉप चौक, ऑरेंज सिटी कॉन्वेंट जवळ गतिरोधक बनविंण्या बाबत निवेदन...

नरखेड बस स्टॉप चौक, ऑरेंज सिटी कॉन्वेंट जवळ गतिरोधक बनविंण्या बाबत निवेदन…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड बस स्टैंड चौकातुन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ट्यूशन, शाळा, कॉलेजला जात असतात नरखेड बस स्टैंड चौकातुन 3 बाजूला वाहतुकीचे रस्ते जात असल्याने विद्यार्थीना रस्ते ओलांडताना अपघात होण्याचा धोका होवू शकतो तसेच नरखेड – सावरगांव मार्गावरील ऑरेंज सिटी कॉन्वेंट रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे विद्यार्थ्याना रास्ता ओलांडताना त्रास निर्माण होत आहे.

करिता सदर दोन्हि ठिकाणी नवीन डिजिटल गतिरोधक बसविण्यात यावे जनेकरून गाड़ी चलविना-या चालकाला गतिरोध दूरुन दिसेल व गाड़ीचा वेग कमी करता येईल अशा प्रकारचे निवेदन जन सेवा संस्था तफेॅ उपविभागीय अभियंता सावर्जनिक बांधकाम उपविभाग नरखेड यांना देण्यात आले.

प्रसंगी जन सेवा संस्था प्रमुख सुरेशजी शेंदरे , राहुलजी नासरे, ठाकुरदासजी अरखेल, ओमप्रकाशजी चव्हाण, विजयजी दातीर,आतुलजी घोगरे,जयदीपजी गोहड़े, गुणवंतजी गिरड़कर, दीपकजी बेहरे, किशोरजी गुरमुळे, अनिलजी अनवाने, मनोहरजी नेहारे, भाऊरावजी ठोंबरे, गौतमजी नारनवरे,गणेशजी उइके, लीलाधरजी मरस्कोल्हे,शंकरजी पाटील, गुणवंतजी पंचभाई उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: