महाराष्ट्रामाणे केंद्रातही ओबीसी म्हणून लाभ मिळावा ही मागणी…
राणी अवंतीबाई लोधी सामाजिक संस्था, काटोलची मागणी
नरखेड – अतुल दंढारे
राणी अवंतीबाई लोधी सामाजिक संस्था, काटोल – महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय मागास वर्ग आयोग भारत सरकारचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व दि.३० मे ला मुंबई येथे विशेष सभेचे आयोजन करण्याचे आश्वासन हंसराज अहिर यांनी शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्रातील लोधी / लोधा / लोध जातीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करून सन २००४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र शासनाने लोधी समाजाला ओ.बी.सी. सूचीमध्ये समाविष्ठ केले, परंतु केंद्राच्या ओ.बी.सी.सूचीमध्ये लोधी समाज हा खुल्या संवर्गात आहे.
महाराष्ट्राशिवाय संपूर्ण देशामध्ये लोधी/लोधा / लोध समाज राज्य व केंद्राच्या ओ.बी.सी.सूचीमध्ये समाविष्ठ आहेत. मात्र महाराष्ट्रातील लोधी/लोधा/लोध जातीला केंद्राच्या ओ.बी.सी. सूचीपासून वंचित ठेवण्यात आलेले असल्यामुळे केंद्राच्या परीक्षा देणारे विद्यार्थी (जसे NEET, JEE परीक्षा) केंद्रीय सरकारच्या नोकरी (जसे केंद्रीय राखीव दल, रेल्वे इ.) साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी यांना केंद्राच्या योजनांचा लाभ घेता येत नाही.
म्हणून लोधी / लोधा / लोध समाजाला उचित न्याय मिळवून देण्याकरिता केंद्रसूची लोधी समाजाचा समावेश करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी शिष्टमंडळात राम खरपुरीया, सुभाष नोरोलीया, संजय गाते,एकनाथ खजूरिया, अज्जूसिंग बासेवार, छोटू खरपूरिया, शेखर खरपूरिया, प्रमोद माहोरिया,उमेश मु्रोडिया,सुखदेव चौधरी, प्रदीप खरपूरिया,रोशन कुमेरिया , अनिल नौकरिया, भुवनेश्वर बासेवार, राजू मु्रोडिया इत्यादी समाजबांधव समाविष्ट होते.