नायब तहसिलदार कुलदीवार यांना दिले निवेदन…
रामटेक – राजू कापसे
खूप दिवसांपासून घोषित केलेली नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे देऊनसुध्दा अजून मिळालेली नाही, ती त्वरित मिळावी याबाबदचे निवेदन चिचाळा येथील शेतकऱ्यांकडून आज रामटेक तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री.कुलदिवार यांना देण्यात आले.
मागच्या वर्षी अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालेले होते. शासनाने जी.आर. काढून मदतीचे आश्वासनसुध्दा दिलेले होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा करून, सदरहू लाभार्थी शेतकऱ्यांची नावे असलेली यादी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतमध्ये पाठवण्यात आलेली होती. दुरूस्त केलेली यादी देऊनसुध्दा खूप काळ लोटल्याने समस्त शेतकरीवर्ग संभ्रमित झालेला आहे.
करिता शासनाने नुकसान भरपाई ची रक्कम त्वरित खात्यात जमा करावी,असे निवेदनाचे पत्र रामटेक तहसील कार्यालय येथील नायब तहसिलदार श्री.कुलदीवार यांना चिचाळा येथील शेतकरी राजकुमार सव्वालाखे, दिनेश बसेने, देवाजी माहूले, अमीर माहूले, पुरूषोत्तम माहूले, हनुमानप्रसाद दमाहे, राहुल दमाहे, बलदेव सव्वालाखे, गणपत सव्वालाखे व चिचाळा गावातील समस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आले.