नरखेड – अतुल दंढारे
आदिवासी पारधी विकास परिषद नागपूर येथील काटोल व नरखेड तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या पारधी समाजाच्या पॅकेज मधून योजनेअंतर्गत योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा. यासाठी आदिवासी पारधी समाजाच्या योजने अंतर्गत राबवून देण्यात येणाऱ्या मागण्याचे निवेदन आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य विजयकुमार गावित यांना देण्यात आले.
यामध्ये पारधी समाजाच्या लोकांचे महसूल विभागाच्या जमिनीवर आणि वन विभागाच्या जमिनीवर शेती व बांधलेल्या घराचे पट्टे देण्यात यावे. पारधी समाजाच्या लोकांना दिनांक 05/10/2006 शासन निर्णय अंतर्गत बीपीएल रेकॉर्डवर पारधी समाजाच्या नाव समाविष्ट करण्यात यावे. भूमी पारधी समाजाच्या लोकांना पाण्याची विहिरीची सोय करावी. पारधी समाजाच्या लोकांना 1950 च्या नुसार शासन निर्णय अंतर्गत कास्ट सर्टिफिकेट ऑनलाइन करण्यात यावी.
पारधी समाजाच्या लोकांच्या महिलांना शासकीय बचत गटाचा लाभ देण्यात यावा. पारधी समाजाच्या लोकांना शासकीय योजनेअंतर्गत राहण्याकरिता घर उपलब्ध करून देण्यात यावे. पारधी समाजाच्या मुला मुलींना शासनातर्फे शिक्षणाकरिता विशेष सवलती देण्यात यावे.
पारधी समाजाच्या शिक्षित झालेल्या मुला-मुलींना त्यांच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्यात यावी. पारधी समाजाच्या लोकांना स्वाभिमान सादरीकरण योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन सादरीकरण योजनेचा लाभ देण्यात यावा.
पारधी समाजाच्या लोकांच्या मुला मुलींच्या लग्नाला शासनाकडून निधी मंजूर करून देण्यात यावा. पारधी समाजाच्या लोकांना शासनाच्या योजनेअंतर्गत व्यवसाय करिता गाई व म्हशी सिमेंट करण रस्ते भूमी अंतर्गत नाल्या, बकरी पालन शेड देण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले.
यावेळी संयोजक रुपेश भाऊसाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते देशराज पवार, विजय समजलाल राजपूत, सुरमा करण राजपूत, आशिष कावडे त्याच प्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयकुमार गावित यांना निवेदन देताना रुपेश पवार व इतर कार्यकर्ते.