Sunday, December 22, 2024
Homeराज्यनांदेड | गोरक्षक कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृन हत्ये संदर्भात विहिंप बजरंग दल कडून...

नांदेड | गोरक्षक कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृन हत्ये संदर्भात विहिंप बजरंग दल कडून आज खामगाव येथे दिले निवेदन..!

नांदेड – हेमंत जाधव

नांदेड जिल्ह्यातील कसायांकडून गोरक्षकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यु झाला व त्याच्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी केले गेले. गोवंशहत्याबंदी कायदा पायदळी तुडवणाऱ्या गोमाफियांवर योग्य अशी कायदेशीर कारवाई करून संपूर्ण महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन सकल हिंदु समाज व विहिंप बजरंग दल च्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेबांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांचा मार्फत प्रत्यक्ष भेटुन निवेदन देण्यात आले त्यामध्ये मागणी करण्यात आली की.

निवेदनातील महत्वाचे मुद्दे –

1) नांदेडमधील ह्या गंभीर गुन्ह्याची विशेष पथक स्थापन करून ” SIT ” मार्फत चौकशी करण्यात यावी.

2) नांदेडमधील मृत्युमुखी पडलेल्या व त्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरक्षकांच्या कुटुंबापर्यंत सरकारतर्फे तातडीने आर्थिक मदत देणेत यावी. तसेच हॉस्पिटलचा खर्च प्रशासनातर्फे करण्यात यावा.

3) संपुर्ण महाराष्ट्रात गौवंशहत्या बंदी कायदा लागू असताना देखील बेकायदेशीरपणे खूप मोठ्या प्रमाणात गौवंशाची कत्तल चालू आहे. स्थानिक पोलिस प्रशासन गौवंशहत्याबंदीची कडक अंमलबजावणी करतांना दिसून येत नाहीत. गौरक्षक रस्तावर उतरला तरच गौवंशाचे प्राण वाचतात.असे दिसून येते त्या मुळे अश्या घटना वारंवार घडू नये म्हणुन गौवंश हत्या बंदी कायदा सेशन कमिटी करण्यात येऊन 10 वर्ष शिक्षा ची तरतूद करावी व वाहन जप्ती करुण सोडन्यात येऊ नए.

4) पुढे ईद असून प्रत्येक जिल्हा, तालुका केंद्रावर एक गौ स्कॉट तैयार करावा व त्यांचे मोबाइल नंबर जाहिर करावे ह्या अतिगंभीर गोष्टीवर योग्य ती कडक कायदेशीर करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा संतप्त इशारा देण्यात आला यावेळी बजरंग दल प्रांत संयोजक ऍड अमोल अंधारे,जिल्हा मंत्री राजेंद्र सिह राजपूत,जिल्हा पालक बापूसाहेब करंदीकर,

श्रीराम जन्मोत्सव समिती सचिव चरखे साहेब,मातृशक्ती चा आणिताताई तनपुरे बजरंग दल जिल्हा सह संयोजक निलेश बरदिया,नगर संयोजक पवन माळवंदे,नगरमंत्री सचिन चांदूरकर,सह मंत्री अमोल जोशी,विहिंप बजरंग दल चे विजय मैदनकर निलेशसिह ठाकूर,सागर खिरडकर,लखन बुंदेले,शुभम ठाकूर,राहुल ठाकूर,अजय खोद्रे,सुशील खोडके,श्याम मोरखडे,अतुल सोनोने,सचिन धामोडे,अविनाश कुटे यांची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: