Monday, November 25, 2024
Homeगुन्हेगारीचाणक्य अभ्यासिका आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत आलापल्लीला निवेदन...

चाणक्य अभ्यासिका आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत आलापल्लीला निवेदन…

वाचनालय निधीतून पुस्तके व भौतिक सुविधा देण्याबाबत निवेदन.

आलापल्ली ग्रामपंचायत येथे आज दिनांक 20 मार्च रोजी वाचनालय निधीतून पुस्तके व भौतिक साहित्य पुरवण्याबाबत चाणक्य अभ्यासिका आलापल्ली (पुणेरी पॅटर्न) च्या 80 विद्यार्थ्यांसहीत निवेदन देण्यात आले. यावेळी चाणक्य अकॅडमी चे संचालक जुगल बोम्मनवार, अभ्यासिका प्रमुख मनोज धुर्वे, सृजनशील सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुमित मोतकुरवार, चाणक्य बहुद्देशीय शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष अभिषेक बोम्मनवार तसेच अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामपंचायत आलापल्ली च्या पेसा अंतर्गत निधीतून चाणक्य अभ्यासिका आलापल्ली करिता पुस्तके व भौतिक सुविधा देण्याबाबत निवेदन दिल्याचे संचालक जुगल बोम्मनवार यांनी यावेळी माहिती दिली. सदर मागणीचा सकारात्मक विचार करून अवश्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे ग्रामपंचायत आलापल्ली चे संरपच शंकर मेश्राम यांनी माहिती दिली.

यावेळी उपसरपंच अकनपल्लीवार जी , सदस्य रामटेके भाऊ, सदस्य बोलूवार भाऊ तसेच स्वरुप गावडे सर उपस्थित होते. चाणक्य अभ्यासिका येथे ग्रामपंचायत आलापल्ली कडून सुविधा मिळाल्यास आम्हा विद्यार्थ्यांचा फायदा होईल असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: