मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव येथील पो.स्टे.येथे ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान ढोले आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे वाशीम युवा जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ कोकरे यांच्या नेतृतवाखालील शिष्ठ मंडळाने निवेदन दिले.
ह्यामध्ये असे नमूद करण्यात आले की, ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदिश मानवतकर यांचे वडील दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी झोडगा येथे बुलेरो पिकप या वाहनाने जागीच अपघाती मृत्युमुखी पडले.
यामध्ये मालेगाव पोलिसांनी 10 ते 15 दिवसांनी या घटनेतील वाहन शोधून काढले परंतु या प्रकणात ना आरोपीची अटक झाली ,ना आरोपी पकडले गेले ,ना आरोपीची विचारपूस करण्यात आली.मालेगाव पो.स्टे.चे संबंधित आरोपी सदर आरोपीला पाठीशी घालत आहेत.असा आरोप जगदिश मानवतकर यांनी केला आहे.
त्यामुळे माझ्या वडिलांच्या प्रकरणात काहीतरी डाळ शिजत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.म्हणून आरोपींना अटक करावे या मागणीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी मालेगाव येथील पो.स्टे. च्या हद्दीत ठिया आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी यावेळी मालेगाव मधील सर्व ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना व ऑल इंडिया पँथर सेना चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान ढोले आणि ऑल इंडिया पँथर सेना चे वाशीम जिल्हा युवा अध्यक्ष आशिष कोकरे यांनी केले आहे.
यावेळी ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे मालेगाव ता.अध्यक्ष सागर डोंगरे , ता. उपाध्यक्ष बंटी लांडगे , ता.संघटक विजय पखाले , मालेगाव शहर अध्यक्ष शे.सोहेल सह मालेगाव मधील सर्व कार्यकर्ते ,समर्थक आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.