Sunday, December 22, 2024
Homeराजकीयपातूर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नवरात्र उत्सवाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची...

पातूर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नवरात्र उत्सवाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची भेट…

नवदुर्गा उत्सव मंडळ गुजरी लाईन येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले नाना पटोले यांचे भव्य स्वागत…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील विविध सामाजिक कार्याचा वसा राखणाऱ्या मंडळा पैकी एक नवदुर्गा उत्सव मंडळ हे नेहमी धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सन उत्सवाचा आनंद द्विगणित करण्याचे काम हाती घेऊन येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेकरिता महाप्रसादाचे आयोजन, तसेच जनजागृतीच्या महत्त्वकांक्षा ठेवून बाल, तरुण युवक युतींना मार्गदर्शनाकरिता संदीप पाल महाराजांच्या कीर्तनातून जनजागृती करत नवरात्रीचा उत्सव साजरा करत आहेत.

या वेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रकाश तायडे यांनी पातूर शहरातील सामाजिक कार्याकरिता हिरीरीने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पातूर शहरातील युवा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत बारताशे , बंटी गहिलोत, तसेच नवदुर्गा उत्सव मंडळाचे विलास देवकर, अंबादास देवकर केशव बगाडे, सागर खोकले,

योगेश शिरसागर, मंगेश देवकर,वैभव देवकर, गजानन बगाडे,इतर कार्यकर्त्यांनी सत्यपाल महाराजांचे कार्यक्रमाचे आयोजन करून यामध्ये प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे.

कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या बेरोजगारी शेतीविषयक धोरण समोर ठेवून काँग्रेस पक्षाला साथ देण्या करिता उपस्थितांना संबोधित केले आहे तर तसेच काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश तायडे यांनी भारत जोडो यात्रा निमित्त राहुल गांधी यांच्या आगमनाविषयी माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: